नोकरशाहिची निर्मिती कोणी केली?
Answers
Answer:
नोकरशाहिची बांधिलकी वसाहतवादी राज्यकर्त्यांशी होती त्यांची बांधिलकी स्वराज्यप्राप्तीनंतर जनतेशी
Explanation:
Answer:
प्रत्येक निवडणुकीपूर्वी विविध राजकीय पक्ष वेगवेगळे जाहिरनामे प्रसिध्द करतात त्यात आणखी जनतेच्या जाहिरनाम्याची भर कशाला? त्याची अंमलबजावणी कोण करणार? असे प्रश्न विचारले जाऊ शकतील; त्यांची उत्तरे प्रारंभीच दिलेली बरी. सर्व पक्षांनी वेळोवेळी जाहिरनामे प्रसिध्द करुन आणि सत्तारुढ पक्ष व नेते ह्यांच्यात वारंवार बदल होऊनही जनतेचे प्रश्र्न सुटलेले नाहीत, उलट समस्या आणखीनच गंभीर होत चालल्या आहेत म्हणून हा जनतेचा जाहिरनामा. त्यातून राजकीय पक्षांना त्यांचे जाहिरनामे प्रकाशित करण्यासाठी योग्य तो बोध घेता यावा, अशी अपेक्षा आहे.
पक्षीय जाहिरनाम्यांच्या अंमलबजावणीवर संरचनात्मक आणि सामाजिक मर्यादा पडलेल्या असतात त्यामुळे त्यांना अपेक्षीत यश मिळू शकत नाही. राजकीय पक्ष, मतदारांच्या कोणत्याही वर्ग किंवा घटकाला जाहिररित्या दुखाऊ शकत नाहीत त्यामुळे अनेक प्रकारच्या प्रस्थापीत हितसंबंध, अन्याय किंवा शोषणाविरुध्द ‘ब्र’ देखील काढणे त्यांना शक्य नसते. शिवाय विद्यमान निवडणूक प्रणालीमध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी जी विविध प्रलोभने द्यावी लागतात त्यामुळे देखील राजकीय पक्षांच्या उपयुक्ततेवर दुष्परिणाम होतो.
खरे तर भारतीय संविधान अंमलात आले त्याचवेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाचा प्रतिज्ञालेख, मुलभूत अधिकार आणि मार्गदर्शक तत्वे , ह्यांच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्याचा उद्देश स्पष्ट करणारा जनतेचा पहिला जाहिरनामा घोषित केला आणि दि. 25 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान घटनासमितीसमोर मांडतांना केलेल्या भाषणात त्यावरील मर्यादा देखील स्पष्ट केल्या. संविधान यशस्वी होण्यासाठी कोणकोणती दक्षता घेणे आवश्यक आहे ह्या संबंधी त्यांनी ह्या भाषणात महत्वपूर्ण मार्गदर्शनही केलेले आहे. हे संपूर्ण भाषण आमच्या वेबसाईटवर जसेच्या तसे त्यावरील सविस्तर टिपणीसह प्रसिध्द केले आहे त्यातील काही ठळक बाबींकडे येथे लक्ष वेधले आहे.