Hindi, asked by mdgangode7, 2 months ago



न.७) खालील विषयावर पत्रलेखन करा.
तुमच्या घरातील व्यक्ती आजारी असल्यामुळे तुम्ही चार दिवस शाळेत जाऊ शकणार नाही
यासाठी वर्ग शिक्षकांना पत्र लिहा.

Answers

Answered by mad210216
4

पत्र लेखन.

Explanation:

प्रति,

माननीय  वर्गशिक्षिका,

लताबेन इंग्लिश हाई स्कूल,

ऐरोली.

विषय: चार दिवसांसाठी रजा मिळण्याबाबत.

माननीय महोदय,

मी, नेहा पाटील, आपल्या शाळेत इयत्ता दहावी- अ मध्ये शिकत आहे. या पत्रातून मला तुम्हाला सांगायचे आहे की, माझ्या आईची तबीयत काही दिवसांपासून ठीक नाही आहे.

आईची तब्येत पूर्णपणे व्यवस्थित होण्यासाठी डॉक्टरच्या सल्ल्यानुसार आणखी चार दिवस लागतील. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की मला दिनांक ३० ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या चार दिवसांसाठी रजा मंजूर करावी, जेणेकरून मला माझ्या आईच्या तब्येतीची पूर्णपणे काळजी घेता येईल.  

मी जबाबदारीने या रजेच्या काळादरम्यान राहिलेला अभ्यास पूर्ण करेन.  

धन्यवाद.

आपली विश्वासु,

नेहा पाटील.

इयत्ता दहावी- अ.

दिनांक: २८ ऑक्टोबर, २०२१

Similar questions