नाम म्हणजे काय ? त्याचे प्रकार सांगा
Answers
Answered by
1
Step-by-step explanation:
नामाचे प्रकार :-
१. सामान्य नाम.
२. विशेष नाम
३. भाववाचक नाम
१. सामान्य नाम :-
एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला मिळालेले नाव म्हणजे सामान्य नाम होय.
उदा० मुले, मुली, शाळा, पुस्तक, इत्यादी.
२.विशेष नाम :-
जे नाम एकाच जातीच्या विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध करते त्या नावाला विशेष नाम असे म्हणतात.
उदा० रामदास, गंगा, यमुना, हिमाचल, इ.
३.भाववाचक नाम :-
ज्या नामामुळे एखाद्या प्राण्यामधील किंवा पदार्थामधील गुणांचा, भावांचा अथवा धर्माचा बोध होते त्या नामाला भाववाचक नाम असे म्हणतात.
उदा० आनंद, दु:ख, इत्यादी.,ई.
Similar questions