Sociology, asked by luptagajbhiye, 8 months ago

निरखून बघणे यावर वाक्य

Answers

Answered by Anonymous
1

Answer:

कोल्हापूर-जोतिबा रस्त्यावर हे झाड पाहिले. रस्तारुंदीकरणात किंवा असेच एखाद्या वादळात मुळापासून उखडले गेले असावे. जे दिसले त्यावर मेंदूत प्रक्रिया होऊन समोरचे दृष्य उमजायला काही सेकंद जावे लागले, नीट निरखून बघावे लागले.

कोल्हापूर-जोतिबा रस्त्यावर हे झाड पाहिले. रस्तारुंदीकरणात किंवा असेच एखाद्या वादळात मुळापासून उखडले गेले असावे. जे दिसले त्यावर मेंदूत प्रक्रिया होऊन समोरचे दृष्य उमजायला काही सेकंद जावे लागले, नीट निरखून बघावे लागले.साधारणत: मुळे अशी अचानक तुटली की जीवनरसाच्या अभावाने झाडाचा मृत्यू अटळच. त्यातून झाड जितके मोठे तितके त्याचा दगावण्याचा धोका जास्त. वाढत्या वयासोबत मुळांवरचे अवलंबित्व वाढत असावे. नवीन रोपाची माती बदलता येते, अलवार उचलून त्याला दुसरीकडे नेता येते. जुनी माती काही काळ मुळांभोवती ठेवून सर्व काही ठीक असल्याचा आभास निर्माण करता येतो आणि त्यालाही ते खरे वाटते. मोठ्या झाडाला वयपरत्वे आलेले शहाणपण दुसरीकडे रुजू देत नाही. आयुष्यभर एकाच जागी घट्ट उभे राहण्यात जगण्याची सगळी उर्जा खर्च झाली असते. जीजिविषा सरत आली असते बहुधा, म्हणूनच मुळे दुरावल्यावर 'सुकून जाणे' हे नशीब अशी झाडे वार्धक्याच्या अपरिहार्यतेने मान्य करताना दिसतात.

Similar questions