World Languages, asked by komalgadekar419, 2 months ago

निसर्ग आणि आम्ही निबंध​

Answers

Answered by ganeshholge7
6

Answer:

आम्ही इतक्या दूरच्या काळात नाही ... मानवी आणि निसर्ग संवाद ... निसर्गावर तत्वज्ञानाचा निबंध लेखक ...

Answered by rajeshsakpal11
9

Answer:

‘निसर्ग आणि माणूस’ यांच्या नात्यासंदर्भात ‘ऋतुरंग’ या दिवाळी अंकात प्रसिद्ध झालेल्या ललित लेखांचा संग्रह असलेल्या ‘निसर्गाच्या छायेत’ या पुस्तकाचे प्रकाशन ‘लोकवाङ्यगृह’तर्फे २४ फेब्रुवारीला प्रभादेवी येथील भूपेश गुप्ता भवन येथे सायंकाळी ६ वाजता होत आहे. या पुस्तकाला संपादक अरुण शेवते यांनी लिहिलेले मनोगत. ‘निवडक ऋतुरंग’ हा ग्रंथ मार्च २०१४ मध्ये प्रकाशित झाला. याचे सर्व श्रेय प्रकाश विश्वासरावांना आहे.

‘निवडक ऋतुरंग’ ही कल्पना प्रकाश विश्वासरावांचीच. ग्रंथ प्रसिद्ध झाल्यानंतर मनात सहज विचार आला. ‘निसर्ग आणि माणूस’ यांच्या नात्यासंदर्भात ‘ऋतुरंग’ दिवाळी अंकात अनेक ललित लेख प्रकाशित झाले. २००६चा ‘ऋतुरंग’चा विशेषांकही ‘निसर्ग आणि माणूस’ हाच होता. गप्पा मारताना मी सहज विश्वासरावांना म्हणालो, ‘निवडक ऋतुरंग’सारखाचा पण वेगळा असा निसर्गविषयक ‘निसर्गाच्या छायेत’ हा ग्रंथ होऊ शकतो. क्षणाचाही विचार न करता ते लगेच म्हणाले, ‘लोकवाङ्यगृह’तर्फेच आपण हा ग्रंथ प्रकाशित करूया.

१९९३ साली ‘ऋतुरंग’ दिवाळी अंक प्रकाशित झाला. गेल्या २१ वर्षात ‘ऋतुरंग’ दिवाळी अंकाला विविध प्रतिष्ठित संस्थांची ६० पारितोषिके मिळाली. ‘ऋतुरंग’ दिवाळी अंकातील लेखांची ४४ पुस्तके प्रकाशित झाली. ४५वे पुस्तक ‘लोकवावाङ्यगृह’कडून प्रकाशित होत आहे याचा मला आनंद आहे.

दरवर्षी ‘ऋतुरंग’ दिवाळी अंकाचा एक विशेषांक असतो. प्रत्येक वेळेस विषय निवडताना अनेक विषयांची मनात गर्दी होत असते. विषय ठरवताना माझ्यासमोर समाजमन असते. समाजभान आणि आत्मभान यांचा समन्वय साधण्याचा माझा प्रयत्न असतो.

‘निसर्ग आणि माणूस’ हा माझा आवडता विषय आहे. निसर्गाशी आपले जन्मापासून अतूट नाते असते. निसर्गाच्या छायेतच आपण सतत जगत असतो. २००६चा अंक ‘निसर्ग आणि माणूस’ हा होता. इतरही विशेषांकांमध्ये त्या त्या अंकाच्या गरजेनुसार निसर्गविषयक लेखांचा अंतर्भाव केला आहे.

‘निसर्गाच्या छायेत’ या ग्रंथात ३९ लेखांचा समावेश आहे. प्रत्येक लेखातून माणूस आणि निसर्गाचे नाते उलगडत गेलेले आहे. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’, ‘नदीच्या आल्याडपल्याड’, ‘पाखरमाया’, ‘घन बरसत आले’, ‘निसर्गाच्या छायेत’असे पाच विभाग केलेले आहेत.

माझे बालपण खेडय़ात गेल्यामुळे झुंजुमुंजु पहाटेचा सुखद वारा अनुभवलेला आहे. आंधळा पाऊस मनात अजूनही पडतोच आहे. सूरपारंब्यांचा खेळ, वडाच्या पारंब्यांना लटकलेली माझी छोटी सावली, इवलीइवली रानफुलं, रानवारा, फांद्याफांद्यांत गुंतलेली झाडे, घडय़ाळाचा अलार्म लावण्याचा तो काळ नव्हता, कोंबडा आरवला की कळायचे आता पहाट झाली आहे. ही सगळी निसर्गाची जादूई स्मृतिचित्रे मनात गडद झालेली आहेत.

भिंतीवरचा रंग पुसला जातो. मनावर उमटलेला निसर्गाचा गर्द हिरवा रंग कधीच पुसला जात नाही. उलट वय वाढत जातं तसा तसा हा रंग अधिकच गडद होत जातो. अनेक शब्द आपल्या विस्मरणात जातात. पण हिरवा बोलीचा शब्द ओठावर आला की मनासमोर हिरवे गर्द रान दिसते. पाऊस पडत असताना आपण आपल्यालाच विसरत जातो. संध्याकाळी दिवेलागण मनाला हुरहुर लावून जाते. निसर्ग आपल्या तनामनात रुंजी घालत असतो. अशा वेळी सहज एक कविता लिहिली जाते.

Explanation:

hope it will help

Similar questions