निसर्गाचे दृश्य पाhun काय होते
Answers
Answer:
पाऊस आणि वरंधा घाट यांचे नाते अतुल्यच. येथील धबधबे, येथे वाहणारे वारे, येथील हिरवेगार रान, पावसाने न्हालेले डोंगर, खळाळत वाहणारे पाणी यांमुळे या घाटाला निराळीच शोभा आली आहे. येथील पावसाळी चिंब वातावरणात भजी, वडे, चहा असे गरमागरम पदार्थ विकणाऱ्या टपऱ्या या वातावरणाची लज्जत आणखी वाढवतात. हा घाट म्हणजे केवळ निसर्गसौंदर्याची उधळणच करत नाही, तर जिगरबाजांकरता थराराची पर्वणीच घेऊन येतो. येथील कावळ्या किल्ला हा थरारक ट्रेकचा अनुभव देतो. ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला हा भाग आजही डौलाने आपल्या इतिहासाची साक्ष देतो. तेथील गर्द झाडी, पावसाची संततधार, तेथील चटकदार मेनू यांमुळे येथून पाय निघत नाही हे निश्चित.
निसर्गाबद्धल तुम्हाला काय वाटते, असा प्रश्न विचारला तर अनेक उत्तरे येतील. कुणाला निसर्ग लहरी वाटेल, कुणाला कृपाळू जीवनदाता वाटेल, तर कुणाला क्रूर वाटेल. निसर्गाला देव मानणारेही कमी नाहीत.