India Languages, asked by tusharbbarai, 2 months ago

निसर्ग हा आपले खरे मित्र आहे​

Answers

Answered by manasvipsarvade317
0

Answer:

निसर्ग म्हणजे सृष्टी होय. हि सृष्टी पृथ्वी, अग्नी, पाणी, वायू आणि आकाश या पांच तत्त्वांनी बनलेली आहे. निसर्ग आणि मानव यांचे नाते हे जन्मापासूनचे आहे. कारण याच पांच तत्त्वातून मानवाचा जन्म झाला आहे.

आपण सर्व या निसर्गात जन्म घेतो, वाढतो आणि विलीन सुद्धा होतो. म्हणून या निसर्गाचे जतन करणे आणि पोषण करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे.

निसर्ग आणि मानव

या निसर्गातून मानवाला फळ, फुल, भोजन आणि इंधन प्राप्त होते. तसेच मानवाला निसर्गातून शुद्ध हवा मिळते. झाडांपासून मानवाला आपले जीवन जगण्यासाठी शुद्ध ऑक्सिजन मिळतो.

हा निसर्ग आम्हा सर्वाना पिण्यासाठी पाणी, खाण्यासाठी अन्न, राहण्यासाठी जागा आणि आमच्या इतर उपयोगांसाठी वनस्पती देतो.

निसर्ग माझा मित्र

निसर्ग हाच आपला गुरु, आपला मित्र आणि आपला डॉक्टर सुद्धा आहे. या निसर्गाकडून आपणास भरपूर काही शिकायला मिळते.

जस फुल काट्यात फुलते तस आपणही प्रत्येक संकटात हसत राहावे, झाडांप्रमाणे नेहमी खंबीरपणे उभ राहून दुसऱ्यांना सहायता करणे, नदीच्या समोर जसे अनेक अडथळे आले तरी ती वाहत असते.

त्याचप्रमाणे आपण सर्वानी कष्टांना न घाबरता सामोरे जाणे आवश्यक आहे. हे सर्व निसर्ग आपल्याला शिकवतो.

Explanation:

thanks

hope it was help you..

Similar questions