नैसर्गिक अधिवास कमी होत असल्याने वन्य प्राणी मानवी वस्त्यांमध्ये घुसण्याच्या घटना वाढत आहेत याची महत्व
Answers
नैसर्गिक अधिवास कमी होत असल्याने वन्य प्राणी मानवी वस्त्यांमध्ये घुसण्याच्या घटना वाढत आहेत.
आजकाल बऱ्याच वेळा आपण बातमी ऐकतो की बिबट्या किंवा तत्सम जंगली प्राणी मानवी वस्तीत शिरला. खरंतर जंगली प्राणी मानवी वस्तीत शिरत नसून मानवाने त्यांच्या अधिवासावर आक्रमण केलं आहे. या जंगली प्राण्यांचं हक्काचं नैसर्गिक ठिकाण मानवाने कब्जा करून हिसकावून घेतलं आहे.
त्याचाच परिणाम म्हणून जंगले कमी झाली आहेत आणि या प्राण्यांना त्यांच्याच स्वतः च्या घरातून हुसकावून लावलं आहे. हे प्राणी मग या वस्तीत येऊन इथे राहण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा मात्र मानवी समाज स्वतः वर हिंस्र प्राण्यांनी आक्रमण केल्याचा कांगावा करत राहतो.
वस्तुतः जंगलांवर अतिक्रमण करून तिथे मानवी वस्ती स्थापन करण्याच्या हव्यासापायी आपण या प्राण्यांवर अत्याचार करत आहोत याची आपल्याला जाणीवही होत नाही. त्या प्राण्यांना त्यांचा नैसर्गिक अधिवास मिळाला तर ते आपणहून मानवी वस्तीत येणार नाहीत.
Answer:
Explanation:
संशोधन पद्धती