Geography, asked by ravikudegawe, 3 months ago

नेसर्गीक मोती कसा तयार होतो, कोणता सागरी जीव मोती तयार करतो त्याची माहिती मिळवा. भारतात असा जीव कोणत्या सगरी प्रदेशात आढळतो त्याची माहिती घ्या​

Answers

Answered by samfernando342
9

Answer:

मोत्याचा इतिहास फार जुना आहे. प्राचीन भारतीय व चिनी वाङ्‌मयात मोत्याचा उल्लेख आढळतो. देवांच्या अस्थिपासून मोती होतात, असे अथर्ववेदात म्हटले आहे. भारतात आर्यांचा प्रवेश होण्यापूर्वी म्हणजे ख्रिस्तपूर्व १५०० वर्षांपूर्वी व ग्रीक संस्कृतीत ख्रिस्तपूर्व ४०० वर्षांपूर्वी मोत्याचा उल्लेख आढळतो. मॅसिडोनियाची सत्ता असताना इराणच्या आखातातून उत्तम मोती काढले जात असत. रोमच्या साम्राज्यातही मोत्यास पुष्कळ महत्त्व होते. या साम्राज्यात काही उच्च पदस्थ अधिकारीच मोती वापरू शकत असत. राजघराण्यातील व्यक्तींचे अलंकार व राजचिन्हे यांसाठी मोत्यांचा सर्रास वापर होत असे. पौर्वात्य देशांशी व्यापारी संबंध जोडून इटलीने तेथील मोती यूरोपात आणले. यूरोपात प्रबोधन कालात मोत्याचे निरनिराळे दागिने वापरात होते. त्या काळात बरोक (ओबडधोबड) मोत्यास जास्त मागणी होती. आधुनिक काळात पूर्ण गोल, आकर्षक रंगाचा, चमकदार व जड मोती जास्त वापरात आहे. ‘ल रेनीडेस पर्ल’ हा २७·५ कॅरट वजनाचा मोती फ्रान्सच्या राजघराण्यात होता. तो १७०२ साली चोरीस गेला. ल रिजेंटी हा ३४ कॅरट वजनाचा मोतीही फ्रान्सकडे होता. कालवे पकडून खाणाऱ्या आदिमानवाला मोत्याचा शोध लागला असावा. मोत्याची चमक व तेज यांमुळे याची गणना मौल्यवान वस्तूंत झाली असावा. ऋग्वेदात सूर्याचा रथ व त्या रथाचे घोडे मोत्यांनी शृंगारले होते असे वर्णन आहे. हिंदू संस्कृतीत मोती हे चंद्राचे रत्न मानले आहे. चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारी असलेल्या मीगॅस्थीनीझ या ग्रीक वकीलांच्या मते भारतात त्या काळात सोन्यापेक्षाही मोत्यास जास्त किंमत होती. वराहमिहिर या विक्रम राजांच्या दरबारी असलेल्या पंडितांनी आपल्या बृहत्संहिता या संस्कृत ग्रंथात ‘मुक्ताफल’ परिक्षा या प्रकरणात मोत्याविषयी बरेच लिहिले आहे. आयुर्वेदीय व युनानी औषध पद्धतींत मोत्यास विशेष महत्त्वाचे स्थान आहे. आयुर्वेदात मोती हा थंड, सारक, वीर्यकर, बल व पुष्टीकारक, पित्तनाशक, खोकला, श्वास इत्यादींवर उपयुक्त व आयुष्यवर्धक आहे, असे सांगितले आहे.

Answered by franktheruler
0

नौसर्जिक मोती शिंपल्यातून तयार होतो .

ऑयस्टर हा सागरी जीव मोती तयार करतो

भारतात असा जीव मन्नार , तमिलऴनाडु आणि कच्छचे आखात , गुजरात येथे आढळतो.

  • ऑयस्टरच्या शिंपल्यांमध्ये मोत्यांचा उगम होतो.
  • है जीव सुंदर मोती बनवतो.
  • एक आगंतुक पदार्थ त्याच्या अंगामध्ये प्रवेश करतो, तेव्हा त्या पदार्थापासून कोणतीही इजा स्वत:ला पोहोचू नये म्हणून तो त्या पदार्थाला ‘नेकर ' मध्ये गुंडाळून ठेवतो. हेच मोती असतो.
  • मॉल्युस्क या प्रकारातील प्राणी आहे ऑयस्टर. हे मोती निर्माण करू शकतो.
  • असं नाही की फक्त ऑयस्टर मोती बनवू शकतो पण
  • मुस्सेलसारखे व क्लॅम मॉल्युस्कसुद्धा मोती तयार करू शकतात.
  • अथर्ववेदात असे म्हटले आहे की देवांच्या अस्थिपासून ही मोती तयार होतो .
  • आम्हि मोत्या पासून दागदागिने बनवतात म्हणून मोत्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
  • सुंदर मोती दागिन्यांमध्ये जडला की त्याला काय ती सुरेख शोभा येते .

#SPJ2

Similar questions