नैसर्गिक संपत्तीने नटलेली भारतभूमी —> पर्यावरणाचा समतोल वन्यजीव वाचवा अभियान भूदया—> गरज व महत्त्व. वरील मुद्द्यांच्या आधारे 'वन्यजीव वाचवा' या विषयावर लेखन लिहा...
Answers
Answer:
वन व वन्यप्राणी यांचे संरक्षण, संवर्धन व जतन करण्यासंबंधी सामान्य जनतेमध्ये जागरुकता निर्माण करण्याची आज गरज आहे. वन्यजीव व्यवस्थापनाचा कायम स्थानिक जनतेशी, लोकप्रतिनिधी आणि अशासकीय संस्थांशी संबंध येतो. त्यादृष्टीने मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे संचालक ए.के.मिश्रा यांच्याशी महान्यूजने वन्यजीव सप्ताहच्या पार्श्वभूमीवर केलेली ही बातचीत
जंगलात वाघ असणे हे समृध्द जंगलाचे प्रतिक आहे. जंगलात असलेल्या अन्नसाखळीमधील वाघ हा मुख्यघटक आहे. तसेच वाघामुळे जंगलात असलेल्या वनस्पतींचे आणि इतर तृणभक्षी प्राण्यांमध्ये समतोल राखला जातो. त्यामुळे वाघ हा पर्यावरणातील असमतोल राखण्यासाठी जैविक साखळीतील महत्वाचा घटक आहे. वाघांची संख्या ज्या जंगलात जास्त असते ते जंगल किंवा तेथील भाग हा सर्व दृष्टीने परिपूर्ण असल्याचे मानले जाते. जंगल उत्कृष्ट असेल तर मानवी जीवन सुसह्य होण्यास कारणीभूत ठरते.
वनसंपदेमुळे सर्व प्राणीमात्रांसाठी आवश्यक असलेला ऑक्सिजन, मुबलक पाणी, आणि जमिनीची धूप थांबण्यासही मदत होते. पर्यायाने जंगलांसाठी सर्व वन्यजीव वाचविणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. त्यात वाघ हा या जैविक साखळीतील महत्वाचा घटक आहे.
Answer:
नैसर्गिक संपत्तीने नटलेली भारतभूमी —> पर्यावरणाचा समतोल वन्यजीव वाचवा अभियान भूदया—> गरज व महत्त्व. वरील मुद्द्यांच्या आधारे 'वन्यजीव वाचवा' या विषयावर लेखन लिहा...