नैसर्गिक साधन संपत्ती म्हणजे काय
Answers
Answer:
आदिमानव गुहेत राहत असे, वनातील फळे व मांस खात असे आणि प्राण्यांची कातडी वा झाडांच्या साली कपडे म्हणून वापरीत असे. अशा प्रकारे त्याचे जीवन निसर्गातून मिळणाऱ्या वस्तूंवर सर्वस्वी अवलंबून होते. आधुनिक मानव त्यापेक्षा अधिक सुखसोयीची साधने असलेले व सुरक्षित जीवन जगत असला, तरी त्याचेही जीवन आदिमानवाच्या इतकेच निसर्गावर अवलंबून आहे. मात्र आधुनिक मानव आदिमानवाच्या मानाने पुष्कळ जास्त व विविध प्रकारच्या वस्तू (वनसंपत्ती, विविध धातू, मूलद्रव्ये इ.) वापरू लागला आहे काही पदार्थांवर (उदा., अग्नी, पाणी) नियंत्रण घालण्यास तो शिकला आहे, काही पदार्थांचे नवनवीन उपयोग त्याने शोधून काढले आहेत आणि नैसर्गिक पदार्थांपासून कृत्रिम पदार्थ (उदा., रंग, प्लॅस्टिक, धागे, वस्त्रे, औषधे इ.) बनविण्याचे कसबही त्याच्या अंगी आले आहे.
मानवाला उपयुक्त अशा निसर्गातील द्रव्यांना नैसर्गिक साधनसंपत्ती म्हणतात. जमीन, महासागर व वातावरण यांतील कोणतेही द्रव्य आर्थिक दृष्ट्या फायदेशीर होऊ शकते व परिणामी ते साधनसंपत्ती होते. एखादे द्रव्य साधनसंपत्ती होण्याच्या दृष्टीने पुरेसे उपयुक्त असावे लागतेच शिवाय त्यासाठी पुढील तीन बाबींची अनुकूलता असावी लागते. (१) द्रव्यात बदल न करता त्याद्वारे मानवी गरज भागविता आली पाहिजे किंवा मानवी गरजेच्या दृष्टीने ते सहज बदलता आले पाहिजे. (२) उपलब्ध द्रव्याचा वापर करून घेण्याइतपत मानवी कौशल्य विकसित झाले असले पाहिजे. (३) ऊर्जा वा इतर साधनसंपत्ती रास्तपणे खर्चून हे द्रव्य सहज मिळविता आले पाहिजे. अशा प्रकारे एके काळी आर्थिक दृष्ट्या निरुपयोगी असलेले एखादे द्रव्य तंत्रविद्येचा विकास झाल्यावर मौल्यवान साधनसंपत्ती होऊ शकते.
नैसर्गिक साधन संपत्ती म्हणजे काय?
मानवी आयुष्यात निसर्गाचे खूप महत्त्व आहे. निसर्गातील प्रत्येक गोष्टी मानवासाठी काही ना काही प्रमाणात उपयोगी ठरत असते. परंतु निसर्गातील काही गोष्टी या मानवाला आर्थिक दृष्ट्या फायदेशीर ठरतात.
निसर्गातील ज्या ज्या गोष्टींमुळे मानवाला आर्थिक दृष्ट्या फायदा होतो अशा प्रत्येक गोष्टीला नैसर्गिक साधन संपत्ती असे म्हणतात.
नैसर्गिक साधन संपत्ती ही आपल्याला जमीन, पाणी, समुद्र, महासागर, भूरूपे, शेती, पर्वत ,गुहा यांच्या माध्यमातून मिळत असते.
काही नैसर्गिक साधन संपत्ती या मानवाला सतत आर्थिक फायदा करून देत असतात तर काही नैसर्गिक साधन संपत्ती या एकदाच वापरता येतात. अनेक प्रकारचे धातू आहेत जमिनीतून मिळत असतात सोने, चांदी, दगडी कोळसा,आणि तेल या गोष्टींचा नैसर्गिक साधन संपत्ती म्हणून गृहीत धरता येतात. काही देशांमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधन संपत्ती असते त्यामुळे त्या देशाचा विकास होण्यास खूप मदत होते.
नैसर्गिक साधन संपत्तीच्या अधिक माहितीसाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करा-
https://brainly.in/question/52407318
https://brainly.in/question/8515511
#SPJ2