निसर्ग माझा मित्र विचार स्पष्ट करा।
Answers
निसर्ग माझा मित्र
पृथ्वीवर जीवन बहरण्याचे एकमेव कारण आहे ते म्हणजे इथले वातावरण आणि निसर्ग. या वातावरणाशीवाय, निसर्गाशिवाय कुठल्याही ग्रहावरती जीवन बहरू शकत नाही. या सौरमंडलात आपण अशा अमूल्य ठिकाणी राहत आहोत, आपलं पूर्ण अस्तित्वच या निसर्गाने मांडले आहे.
जेव्हा एखादा नवीन ग्रह बनतो तो लाव्ह्याचा एक जळता गोळा मात्र असतो, हा गोळा अवकाशात लाखो वर्ष फिरत राहतो. तो हळूहळू थंड व्हायला सुरुवात होते पण या प्रक्रियेत सुद्धा लाखो वर्षं निघून जातात.
अशा लाखो वर्षांच्या मेहनतीनंतर ग्रह जेव्हा पुरेसा थंड होतो तेव्हा जीवनचक्राचे पहिले पाऊल ग्रहावरती पडते, ते म्हणजे वातावरण बनण्याची सुरुवात. कुठलही ग्रहावरती वातावरण बनण्यासाठी कार्बोन डाय ऑक्साइड सारख्या ग्रीन हाऊस वायूंची गरज असते. तिथल्या जमिनीवरच्या रासायनिक प्रक्रियेतून, ज्वालामुखी मधुन हे ग्रीनहाउस वायू बाहेर पडतात आणि हळूहळू वातावरण बनायला मदत करतात.
लाखो वर्षांच्या या प्रक्रियेनंतर तो ग्रह संतुलित होतो, जर तिथे पाण्याचे अस्तित्व निर्माण झाले तर जीवनाची दुसरे पाऊल उचलले जाते. जिवाणूंच्या रूपामध्ये जीवनचक्र आपले काम चालू करते. परत एकदा लाखो वर्षांच्या उत्क्रांती नंतर छोटे छोटे प्राणी, पक्षी, झाडेझुडपे, सजीव रूप घेऊ लागतात. हळूहळू त्या ग्रहावरती निसर्ग आपले अस्तित्व प्रस्थपित करायला सुरुवात करतो आणि मग हा निसर्ग प्राणी, पक्षी, झाडे, झुडपे, कीटक वाढवतो. आणि मग तिथून जीवनचक्राचा पुढचा लाखो वर्षांचा प्रवास सुरू होतो.