Hindi, asked by TrishaTalmale, 18 days ago

'निसर्ग माझा सोबती' या विषयावर खालील मुद्दयांच्या आधारे तुमचे विचार लिहा.
(मुद्दे : निसर्गाचे घटक माणूस व निसर्ग - निसर्गाचे महत्त्व संवर्धन - भविष्य)​

Answers

Answered by tanujakale62
3

आजच्या आधुनिक युगात मनुष्य निसर्गाला साधारण आणि तुच्छ समजत आहे. कारण निसर्ग चारही बाजूंना सहज उपलब्ध झाला आहे. आणि जी गोष्ट व्यक्तीला सहज मिळते त्या गोष्टीची किंमत व्यक्तीला राहत नाही. परंतु खरे पाहता निसर्ग मनुष्याचा अतिशय घनिष्ट मित्र आहे व तो मनुष्यासाठी नेहमी उपयोगी ठरत असतो. ज्या पद्धतीने एक खरा मित्र नेहमी, प्रत्येक संकटात आपल्या सोबत असतो त्याच पद्धतीने निसर्गही आपला सोबती आहे. निसर्ग हा फक्त मनुष्याचाच मित्र नसून तो पशू व पक्ष्यांचाही घनिष्ट मित्र आहे. कारण तो मनुष्या सोबत पशू पक्ष्यांची देखील अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याची व्यवस्था करीत असतो. आपल्याला निसर्गाचे संतुलन न बिघडवता याचा योग्य उपयोग करवून घ्यायला हवा. निरोगी जीवनासाठी निसर्गाचा पूर्णपणे उपभोग घेणे अतिशय आवश्यक आहे. आपल्याला आपल्या निसर्गाकडे लक्ष्य द्यायला हवे याला स्वच्छ ठेवायला हवे. इकडे तिकडे कचरा न टाकता त्याला कचरा कुंडीत टाकून योग्य विल्हेवाट लावायला हवी

Similar questions