८
निसर्ग सौंदर्य कायम राहण्यासाठी काय करावे असे तुम्हाला वाटते.
Answers
Answer:
निसर्गाने मानवाला भरभरून वरदान दिले आहे. माणसाची घेण्याची शक्ती, कुवत संपेल परंतु निसर्गाचे हात रिते होत नाहीत. हिरवेगार डोंगर झाडे, वेली, पशु, पक्षी काय काय बघावे आणि कितीदा बघावे. निसर्ग सौंदर्य बघून डोळ्याचे पारणे फिटते पण वारंवार पहात रहावे डोळ्यात मनात साठवत ते सौंदर्य हृदयात जतन केले जाते. भारतातील पश्चिम घाटात राधानगरी म्हणजे दाजीपूर अभयारण्य, सह्याद्रीमधील दक्षिण व उत्तरेकडील पश्चिम घाटाला जोडणारा हा अतिशय महत्त्वाचा जंगलपट्टा आहे.
कोल्हापूरचे संस्थान खालसा होण्यापूर्वी संस्थानिकांची व शिकारी प्रेमींची खास सोय म्हणून दाजिपुरचे जंगल आरक्षित होते. कालांतराने कोल्हापूर संस्थान महाराष्ट्रात विलिन झाले आणि 1958 मध्ये दाजिपूर जंगल गवा अभयारण्य झाले. दाजिपूर अभयारण्याची महाराष्ट्रातील सर्वात जुने अभयारण्य म्हणून नोंद झाली आहे.
येथील वैशिष्ट्य म्हणजे दुर्मिळ होत चाललेला पट्टेरी वाघ व बिबळ्या, फक्त पश्चिम घाटातच आढळणारे लहान हरिण (पिसोरी), जगात केवळ पश्चिम घाटात आढळणाऱ्या दहा प्रजातींचे पक्षी येथे बघायला मिळतात. त्याचबरोबर ऑलिव्ह फॉरेस्टस्नेक, एरिक्स व्हिटेकरी पाईट वेली, शिल्डटेल या दुर्मिळ सापांची नोंद देखिल या अभयारण्यातच झाली आहे. दाजिपूरचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे 121 प्रजातीची फुलपाखरे.