India Languages, asked by anjushreyeolekar, 4 months ago

नाशिक शहरात अचानक पाऊस पडला याची बातमी बनवा​

Answers

Answered by samirpanchal0092
2

Answer:

नाशिकला आज पावसाने अचानक जोरदार तडाखा दिला. दुपारी सुमारे सव्वातास वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह शहर व परिसरात पावसाने धुमाकूळ घातला. दरम्यान, गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्याने एक गाडी वाहून गेली असून त्याबाबत अधिक तपशील मिळालेला नाही.

नाशिकला आज पावसाने अचानक जोरदार तडाखा दिला. दुपारी सुमारे सव्वातास वादळी वारे व विजांच्या कडकडाटासह शहर व परिसरात पावसाने धुमाकूळ घातला. दरम्यान, गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढल्याने एक चार चाकी वाहन वाहून गेले असून त्याबाबत अधिक तपशील मिळालेला नाही.

पावसाच्या जोरदार तडाख्यामुळे नाशिककरांची एकच तारांबळ उडाली. शहरातील सराफा बाजारात पाणी शिरल्याने उद्भवलेल्या स्थितीचा सामना करताना व्यावसायिकांच्या नाकीनऊ आले. सिटी सेंटर मॉल चौकासह शहरातील विविध रस्ते जलमय झाले होते. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली. सिटी सेंटर मॉल येथील सिग्नलजवळ सुमारे तासभर चक्काजामसारखी स्थिती होती.

Similar questions