निषिद्ध आब्यांच्या फळांचा आकार बिघडविण्यास (मालफॉर्मेशन) कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता कारणीभूत असते ?
Answers
Answer:
अन्नद्रव्यांची कमतरता कशी ओळखावी...
1) नत्र - झाडांची खालची पाने पिवळी होतात, मुळांची व झाडांची वाढ थांबते, फूट व फळे कमी येतात.
2) स्फुरद - पाने हिरवट लांबट होऊन वाढ खुंटते, पानांची मागची बाजू जांभळट होते.
3) पालाश - पानांच्या कडा तांबडसर होऊन पानांवर तांबडे व पिवळे ठिपके पडतात. खोड आखूड होऊन शेंडे गळून पडतात.
4) जस्त - पानांचे आकारमान कमी होते. पानांतील शिरांमधील भाग पिवळा पडतो. पिकांची वाढ खुंटते. पिकांमध्ये पेरे लहान पडतात.
5) लोह - शेंड्याकडील पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो, झाडांची वाढ खुंटते.
6) तांबे - पिकांच्या शेंड्याची वाढ खुंटते व पाने लगेच गळून पडतात. तसेच पाने अरुंद वाटतात. पानांचे टोक व कडा फिक्कट पिवळ्या दिसतात.
7) बोरॉन - टोकांवरील नवीन पालवीचा रंग देठाकडून फिक्कट होऊ लागतो. नवीन पाने मरतात. पानांना सुरकुत्या पडून पिवळे चट्टे पडतात. पिकांच्या शेंड्याकडील पाने मरतात.
8) मॉलिब्डेनम - पाने फिक्कट हिरवी पडतात. तपकिरी ठिपके पानांवर दिसतात. पानांच्या खालच्या भागातून तपकिरी डिंकासारखे द्रव्य स्रवते.
9) गंधक - झाडाच्या पानांचा मूळचा हिरवा रंग कमी होतो, नंतर पाने पूर्ण पिवळी-पांढरी पडतात.