Political Science, asked by SANIYWRATHOD23, 11 months ago

नेता एक आदर्श मराठी भाषण​

Answers

Answered by brainlylover77
1

Explanation:

hello dear your answer is here

please mark me brainlist ♥️❤️❤️❤️

एक आदर्श नेता लोकमान्य टिळक

लोकांनी ज्यांचे नेतृत्व मान्य करून ज्यांना ‘लोकमान्य’ केले, तो आदर्श नेता म्हणजे बाळ गंगाधर टिळक. असामान्य बुद्धिमत्ता लाभलेल्या या नेत्याकडे दैदिप्यमान गुण असल्यामुळेच हा नेता निद्रिस्त समाजाला जागृत करू शकला.

लोकमान्यांचे कार्य या दृष्टीने खरोखरच अवघड होते. कारण एकोणिसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत भारतीय समाजाला गुलामगिरीची जाणीवही झाली नव्हती. अशा या मृत समाजात लोकमान्यांनी स्वातंत्र्यभावनेचे स्फुल्लिंग पेटविले. बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म जुलै २३ इ.स. १८५६ साली झाला आणि मृत्यू १ ऑगस्ट १९२० साली झाला. टिळकांच्या वडिलांचे नाव गंगाधर रामचंद्र टिळक असे होते आणि आईचे नाव पार्वतीबाई टिळक असे होते. बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसेनानी, राजकारणी, लेखक, वक्ते, तत्वज्ञ आणि संपादक होते.

‘लोकमान्य’ या उपाधीने त्यांचा उल्लेख केला जातो. आपल्या आयुष्यातील क्षणन क्षण या नेत्याने लोकसेवेसाठी तसेच लोकजागृतीसाठी व्यतीत केला. आपल्या देशातील सामान्य जनतेची साथ लाभल्याशिवाय आपल्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या चळवळीला यश लाभणार नाही, हे ओळखून लोकमान्यांनी चिपळूणकर, आगरकर या सहकाऱ्यांच्या साहाय्याने शाळा, कॉलेज काढली.

‘केसरी’, ‘मराठा’ ही वृत्तपत्रे काढली. या वृत्तपत्रांतून लेखन करताना परक्या इंग्रजी सत्तेबद्दल लोकांमध्ये घृणा निर्माण करणे हेच त्यांचे उद्दिष्ट होते.

Similar questions