नाताळ विषयी माहिती, निबंध, भाषण मराठीमध्ये – Essay, Speech...
Answers
Answer: नाताळ हा ख्रिस्ती बांधवांचा महत्त्वाचा सण आहे. प्रत्येक वर्षी २५ डिसेंबर रोजी जगातील बहुतेक भागांंत हा सण साजरा केला जातो.
या दिवशी प्रभू येशू जन्माला आले असे ख्रिस्ती बांधव मानतात. म्हणून त्यांच्या दृष्टीने हा दिवस अत्यंत पवित्र असतो. या दिवशी ते चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करतात. दिव्यांची रोषणाई करून घर सजवतात. 'ख्रिसमस ट्री' हे था सणाचे प्रमुख आकर्षण असते. या दिवशी लोक एकमेकांना मिठाई आणि शुभेच्छा देतात. नाताळबाबा लहान मुलांना खाऊ आणि भेटवस्तू देतो.
असा हा नाताळ सण फार आनंदाचा असतो.
Explanation:
⠀⠀⠀⠀⠀⠀⠀⠀नाताळ
'नाताळ' हा ख्रिस्ती बांधवांचा सर्वांत मोठा सण आहे. आज इतर धर्मांचे लोकही या सणाचा आनंद लुटतात. नाताळ म्हणजे ख्रिसमस हा सण दरवर्षी पंचवीस डिसेंबरला साजरा केला जातो. हा येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस आहे. चोवीस डिसेंबरची रात्र ही नाताळची रात्र म्हणून साजरी केली जाते.
या दिवशी ख्रिस्ती बांधव आपले घर पताका, फुले यांनी सजवतात. पांढऱ्या शुभ्र कागदाची चांदणी आकाशकंदील म्हणून टांगतात. या सणाच्या निमित्तानेख्रिस्ती बांधव एकमेकांना शुभेच्छा देतात. काही घरांतून 'ख्रिसमस ट्री' सुदधा तयार करतात.
नाताळच्या दिवशी सर्व ख्रिस्ती बांधव चर्चमध्ये जाऊन परमेश्वराची पार्थना करतात नाताळच्या रात्री घरातील सर्व लहानमोठी माणसे एकत्र येऊन नाताळाची गाणी गातात त्या रात्री नाताळबाबा छोट्यांना भेटी देतो. नाताळात गरिबांना दाना जातो. 'सर्वांना सुखशांती लाभो', अशी सदिच्छा या दिवशी सर्वजण व्यक्त करतात.