नाट्य संहितेचे स्वरूप स्पष्ट करा ?
Answers
Answered by
6
Answer:
नाट्यसंहितेसाठी पूर्वतयारी महत्त्वाची आहे. सशक्त, दर्जेदार व परिपूर्ण कथाबीजाभोवती नाटककार निवडक घटना व व्यक्तिरेखा यांची गुंफण करतो. नाट्यतंत्रानुसार नाटकाची वैशिष्ट्यपूर्ण रचना करावी लागते. समाजातील विविध स्तरांवरील जनमानसाला जिव्हाळ्याचे वाटणारे विषय घेऊन मनोव्यापारांचे यथार्थ रसपूर्ण दर्शन घडवणे, हे नाट्यसंहितेचे मर्म आहे. कथानकाला साजेशी निवडक पात्र रचना करणे व परस्परविरोधी स्वभावांतील ताणांमधून संघर्ष निर्माण करणे, हा नाट्यसंहितेचा आदिबंध आहे. संवाद हा नाट्यसंहितेचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. चुरचुरीत, नर्मविनोदी, कधी खटकेबाज, तर कधी भावोत्कट संवादांची पखरण नाट्यसंहितेत असावी लागते. अशा प्रकारे संवाद, संघर्ष, मनोव्यापारातील चढउतार, स्वगतातील भावपूर्णता व रंगसूचना यांच्या समतोल मेळातून नाट्यसंहिता सशक्त व समर्थ होते.
Similar questions