नाटक हा वाङ्मयप्रकार इतर वाङ्मय प्रकारांपेक्षा वेगळा अाहे हे विधान स्पष्ट करा
Answers
Answer: कथा, कविता, कादंबरी, चरित्र, विनोद, ललितगद्य, नाटक असे वाङ्मयाचे विविध प्रकार आहेत. या सर्वांमध्ये नाटक हा प्रकार अनेक बाबतीत वेगळा आहे.
नाटक म्हणजे एखाद्या कलाकाराने जिवंत, मृत, वास्तविक, काल्पनिक व्यक्ती अथवा प्राण्यांची रंगमंचावर साकारलेली भूमिका होय. नाटकामध्ये संवाद, संगीत, नृत्य यांचा समावेश असू शकतो परंतु यातली एकही गोष्ट नाटकासाठी अनिवार्य नाही. तसेच नाटक सादरीकरणाला लागणारा वेळ हा इतर वाङ्मयीन प्रकारापेक्षा खूप अधिक असू शकतो. एखादे नाटक सलग न चालता काही दिवस चालू शकते.
Explanation:
*नाटक हा वाङ्मयप्रकार इतर वाङ्मय प्रकारांपेक्षा वेगळा आहे हे विधान अत्यंत बरोबर आहे. *
सर्व वाङ्मयप्रकारामध्ये लेखक/कलाकार आपले भाव प्रकट करतात. पण नाटक हा वाङ्मयप्रकार असा आहे ज्याच्यात नाटककार आपल्या लेखणीतून मनोरंजन आणि समजूत याचा असा मेळ जोडतो कि नाटकाला त्याचे वेगळेपण मिळते.
कलाकार नाटकाच्या माध्यमातून आपले अभिनय रंगमंचावर सादर करतात. भूमिका कोणतीही असो, अभिनेत्या त्या साच्यात स्वतःला आकार देऊन पाहणाऱ्याला मंत्रमुग्ध करतो. नाटक हा एक असा वाङ्मयप्रकार आहे ज्याच्यात सर्व प्रकारचे वाङ्मय समाविष्ट असू शकतात. ह्यात कविता, भाष्य, संगीत, नृत्य याचा उपयोग सुद्धा होतो, जे दुसऱ्या कोणत्या वाङ्मयप्रकारात आढळून येत नाही.