नाटक सामजिक प्रबोधन कसे घडवुन आणते?
Answers
नाटक म्हणजे जिवंत, मृत, पौराणिक, ऐतिहासिक किंवा काल्पनिक व्यक्ती किंवा प्राणी यांच्या भूमिका करणाऱ्या नटांनी रंगमंचावर सादर केलेली, बहुधा संवादात्मक , अभिनयमय, नृत्यमय किंवा काव्यात्मक कलाकृती असू शकते. नाटकामध्ये शब्दसंहिता, त्याचप्रमाणे कथानक, त्यात आलेल्या विषयांचा तपशील, संवाद, पदे, वाद्यसंगीत, पार्श्वसंगीत, नृत्ये, संघर्ष, उत्कंठा, नेपथ्य, वेश-रंगभूषा, प्रकाशयोजना, अभिनय आणि कथानक असू शकते. पण यांतली एकही गोष्ट नाटकासाठी अपरिहार्य वा अनिवार्य नाही. सॅम्युअल बेकेट यांचे 'ब्रेथ' हे नाटक शब्दसंहिताविरहित आणि अभिनयविरहित आहे. नाटकाचा प्रयोगकाल काही सेकंदांपासून (उदा. ब्रेथ) बारा तासांपर्यंत(उदा. पीटर ब्रुक यांचे महाभारत) असू शकतो. ‘वाडा चिरेबंदी’ सारखे नाटक सलग सादर न क रता दोन दिवसही सादर होऊ शकते. नभोवाणीवरील श्रुतिका एकाहून अधिक दिवस चालू शकतात, तर दूरचित्रवाणीवर मालिका महिनोन्महिने चालतात. नाट्यवाचन हा त्यातील प्रमुख प्रकार आहे. नाटक हा साहित्याचा अविभाज्य घटक आहे. महाराष्ट्र हा नाटयवेडा प्रदेश म्हणून ओळखला जातो. महाराष्टाला नाटकांची प्राचीन व समृद्ध परंपरा आहे. अभिव्यक्तीचे सशक्त माध्यम नाटक:- नाटकासारख जिवंत माध्यम जिथे असतं, आणि जिथे जीवंत माणसं जीवंत माणसांशी संवाद साधत असतात, आता उघड आहे जीवंत माणस एकाच कालखंडात जगत असतात. त्यामुळे त्या त्या काळातल्या माणसांबरोबर त्या त्या काळातले प्रश्न आदान प्रदान करणं, आपले विचार, आपल्याला काय वाटत हे लोकांसमोर मांडणं हा एक महत्वाचा त्यातला भाग असतो. आणि त्याच्यातच खरा खूप महत्वाचा आनंद असतो. कुठलाही झालेला प्रयोग हा परत कधी होत नाही. प्रयोग नेहमी नविनच होत असतो म्हणून नाटकाला प्रयोग म्हंटलेल आहे. प्रत्येक वेळी त्याच्यात तुम्हाला काहीतरी नवीन सापडतं. आता सापडणं हेच जर तत्व मान्य केल तर ते सापडण्यासाठी आपल्या फुटपट्ट्या काय असाव्यात, आपण त्याला कुठल्या प्रकारच्या मोजपट्ट्या लावतो हा केवळ आपला व्यक्तिगत मुद्दा येतो. मला काय आवडतं, मला काय वाटतं, माझ्या आजच्या सामाजिक धारणा काय आहेत, माझ्या संवेदना काय आहेत, मला समाजकारण - राजकारणा विषयी काय वाटत, आज माणूस म्हणुन जगत असताना आपले अत्यंत कळीचे, अत्यंत टोकाचे प्रश्न काय आहेत की ज्यामुळे आपल्याला अगदी कोंडीत पकडल्या सारखे वाटते, हे महत्वाचे असते.अभिव्यक्त कशातनंही होणं याला आपण माध्यम म्हणतो. म्हणूनच नाटक हे अभिव्यक्तीचे प्रभावी माध्यम आहे.
उत्तर :-
1. नाटक म्हणजे ललित कला व्यक्तीने किंवा समुदायाने रंगभूमीवर सादर केलेली कलाकृती होय.
2. सुरुवातीच्या काळात म्हणजेच एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात ऐतिहासिक, पौराणिक नाटके निर्माण झाली.
3. त्यांच्याबरोबरच अलिखित नाटके म्हणजेच प्रहसने रंगभूमीवर आली.
4. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस संगीत नाटकांची परंपरा सुरू झाली.
5. सामाजिक प्रश्न व ऐतिहासिक विषय नाटकात हाताळले गेले.
6. काही नाटके रंगभूमीवर सादर न करता रस्त्यावर मूकाभिनयाने सादर केली जात, त्यांना पथनाट्ये म्हणत.
7. पथनाट्याने लोकजागृती केली जात असे.
अशा प्रकारे,
नाटक सामाजिक प्रभोधन घडवून आणते.