१)न्यायमंडळाच्या स्वातंत्र्यासाठी संविधानात स्पष्ट तरतुद करणारा देश म्हणजे.
(भारत, अमेरिका, सोहिएत रशिया, युनायटेड किंग्डम,)
Answers
Explanation:
१)न्यायमंडळाच्या स्वातंत्र्यासाठी संविधानात स्पष्ट तरतुद करणारा देश म्हणजे भारत
Answer:
१)न्यायमंडळाच्या स्वातंत्र्यासाठी संविधानात स्पष्ट तरतुद करणारा देश म्हणजे भारत.
Explanation:
भारताच्या संविधानाने यावर उपाय म्हणून उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश नेमताना कार्यकारी मंडळाने मुख्य न्यायाधीशांचा सल्ला घ्यावा अशी तरतूद केली. असा सल्ला किती मर्यादेपर्यंत बंधनकारक राहील हा प्रश्न अर्थातच वादग्रस्त बनला. पण संविधानाचा अन्वयार्थ लावण्याचा आपला अधिकार वापरुन न्यायालयाने असा निर्णय दिला की हा सल्ला बंधनकारक असेल आणि तो देण्यासाठी मुख्य न्यायाधीशांच्या बरोबर ज्येष्ठ न्यायाधीशांचे मिळून एक मंडळ (collegium) असेल. म्हणजे एकीकडे सल्ला बंधनकारक ठरवतानाच तो सल्ला देण्याचे काम एकट्या मुख्य न्यायाधीशांकडून काढून घेतले गेले! मात्र या निर्णयामुळे न्यायाधीश-नेमणुकीत कार्यकारी मंडळाला म्हणजे केंद्रसरकारला थेट हस्तक्षेप करण्याची संधी अगदीच नाममात्र राहिली. (या अर्थाने पाहिले तर भारतात न्यायालयीन स्वातंत्र्य सर्वात जास्त प्रभावी आहे असे म्हणावे लागेल. पण त्यामुळे व्यवहारातले वाद मिटले असे मात्र झालेले नाही.)