English, asked by Evya6953, 1 year ago

Nadichi Atmakatha in Marathi | Nadiche Atmavrutta Essay, Nibandh

Answers

Answered by Hansika4871
19

"वेडीवाकडी वाहते नदी

कित्येक गावागावातून !

रौद्र होते ती कधीकधी

पण नाही जात मनातून..."

ह्या अनिल दाभाडे ह्यांच्या कवितेच्या ओळी ज्या मला संबोधित करतात त्या नक्कीच ऐकल्या असाल तुम्ही!

नमस्कार कोकणाच्या एका छोट्या गावातून मी वाहणारी एक नदी. यंदा वरुण राजाच्या कृपादृष्टी मुळे माझा प्रवाह जोमाने वाहतोय! "पाणी हेच जीवन" ही म्हण तुम्ही ऐकली असेलच आणि त्यामुळे गावातली लोक माझा वापर वेगवेळ्या गोष्टींसाठी करतात. पण कधी कधी लोक माझा गैरवापर करतात, कचरा प्लास्टिक सगळ माझ्या पात्रात टाकतात त्यामुळे मासे, पक्षी, प्राणी जे माझे पाणी पितात त्यांना खूप त्रास होतो. पाण्याचे प्रदूषण होते व पिण्यासाठी आपण हे पाणी वापरू नाही शकत तर कृपया लोकांना मला साफ ठेवायला सांगा, मी विनंती करते. कधी कधी उन्हाळ्यात माझे पाणी सुकून जाते आणि मी कोरडी पडते. पण जेव्हा पाऊस येतो आणि माझे पात्र पूर्ण भरते तेव्हा मी नव्याने वाहायला लागते. माझा प्रवाह समुद्राला जाऊन भेटतो आणि गोड पाणी खऱ्या पाण्यासोबत मिसळते. कधी कधी मुलं आणि जनावर माझ्या पात्रात आंघोळ करतात ह्याचे मला खूप कौतुक वाटते. मी लोकांची तहान भुजवते, कपड्या भांड्यासाठी पाणी देते इत्यादी. हे सगळं करण्यात मला खूप आनंद होतो.

पण असो लोकांच्या चेहऱ्यावर आनंद पाहण्यात मला खूपच बरे वाटते! आणि मी त्यात सुखी आहे.

Similar questions