nag panchmi information in marathi language only
Answers
hi frnd here is ur ans
Explanation:
Nag panchmi ha.ek marathi sanskrutiyla saan aahe. ya maadhe naagachi puja kartat. pn hya maage ek hetu aasto.toh manjhe nagan vachvave karan nag ha shetkaryacha mitra aahe . mhanun tyala thanks mhennyasathi ha saan sahara kartyay
Answer:
आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे”. श्रावण महिना, सणांचा, उत्सवांचा, आनंदाचा आणि उत्साहाचा महिना. या महिन्यात निसर्ग सुद्धा हिरवा शालू पांघरून मिरवत असतो. मनुष्य, प्राणी, पक्षी व झाडे सर्वच या महिन्यात आनंदाने बहरून जातात.
हा महिना सणांचा महिना आहे व त्याची सुरवात सुद्ध पंचमीला नागपंचमीने होते. आपल्या हिंदू संस्कृतीत भूतदया व सहिष्णुता यांना फार महत्व आहे. म्हणून श्रावण महिना शाकाहाराने पाळतात. म्हणून या महिन्यात सणांची सुरवात होते नागपंचमी पासून.
आपल्याला लहानपणापसून शिकवण्यात येते कि साप हा शेतकऱ्याचा मित्र आहे, इतकेच नव्हे तर आपल्या हिंदू संस्कृतीत महादेवाने गळ्यात नाग परिधान केला आहे तर भगवान विष्णू हे नागावरच झोपलेले असतात. या सणामध्ये आपण या नागाच्या जवळ पोहोचतो, त्याची पूजा करतो.
शेती हा आपल्या देशाचा प्रमुख व्यवसाय आहे. आणि साप शेतीच्या कार्यात फारच महत्वाचा कार्यभाग सांभाळतो. शेतातील उंदीर व अन्य हानिकारक जीवावर उदरनिर्वाह करून तो शेताची एका प्रकारे निगा करतो. क्षेत्र (शेत) पाल (रक्षक) असे सापाचे क्षेत्रपाल असेही नाव आहे.
नागपंचमी च्या दिवशी काहीही कापू नये, चुलीवर तवा ठेऊ नये असे पथ्य पाळतात. इतर सणांप्रमाणेच सकाळी पहाटे उठून स्नान करून तयार व्हावे लागते. त्यानंतर गंध, हळद कुंकू व इतर पूजेच्या सामाग्रींनी पाटावर ५ फण्यांच्या नागाचे चित्र काढावे व त्याची पूजा, त्याला दुधाचा नैवेद्य दाखवावा.
हा सन संपूर्ण भारतभर साजरा केला जातो, श्रीकृष्ण व कालिया मर्दनची गोष्ट अतिशय प्रसिद्ध आहे. हा स्त्रियांचा सन असून या दिवशी गावातील मुली व स्त्रिया देवळात व वारुळा जवळ जाऊन त्याची पूजा करतात. झिम्मा, फुगडी व झोका असे खेळ खेळतात. यामुळे हा सन स्त्रियांसाठी एक आनंदाची पर्वणीच असते.
नागपंचमी ला अनेक ठिकाणी गारुड्यांकडून जिवंत नागांना दुध पाजले जाते. आता ते नरेंद्र दाभोळकरांसारख्या समाजसुधारकांच्या प्रयत्नांमुळे कमी झाले आहे. परंतु सापाला किव्वा नागाला दुध पाजू नये, त्यांची शरीर रचना दुध पचवण्यासाठी योग्य नसते आणि यामुळेच नागपंचमीला अनेक नाग मृत्युमुखी पडतात. तेव्हा आपण हा सन आपल्या क्षेत्रपालाला त्रास न देत त्याच्या प्रतिमेसोबतच साजरा केला तर या सनाच महत्य टिकून राहील.