Naisargik sadhan sampati sampali tar
Answers
Answer:
आदिमानव गुहेत राहत असे, वनातील फळे व मांस खात असे आणि प्राण्यांची कातडी वा झाडांच्या साली कपडे म्हणून वापरीत असे. अशा प्रकारे त्याचे जीवन निसर्गातून मिळणाऱ्या वस्तूंवर सर्वस्वी अवलंबून होते. आधुनिक मानव त्यापेक्षा अधिक सुखसोयीची साधने असलेले व सुरक्षित जीवन जगत असला, तरी त्याचेही जीवन आदिमानवाच्या इतकेच निसर्गावर अवलंबून आहे. मात्र आधुनिक मानव आदिमानवाच्या मानाने पुष्कळ जास्त व विविध प्रकारच्या वस्तू (वनसंपत्ती, विविध धातू, मूलद्रव्ये इ.) वापरू लागला आहे काही पदार्थांवर (उदा., अग्नी, पाणी) नियंत्रण घालण्यास तो शिकला आहे, काही पदार्थांचे नवनवीन उपयोग त्याने शोधून काढले आहेत आणि नैसर्गिक पदार्थांपासून कृत्रिम पदार्थ (उदा., रंग, प्लॅस्टिक, धागे, वस्त्रे, औषधे इ.) बनविण्याचे कसबही त्याच्या अंगी आले आहे.
मानवाला उपयुक्त अशा निसर्गातील द्रव्यांना नैसर्गिक साधनसंपत्ती म्हणतात. जमीन, महासागर व वातावरण यांतील कोणतेही द्रव्य आर्थिक दृष्ट्या फायदेशीर होऊ शकते व परिणामी ते साधनसंपत्ती होते. एखादे द्रव्य साधनसंपत्ती होण्याच्या दृष्टीने पुरेसे उपयुक्त असावे लागतेच शिवाय त्यासाठी पुढील तीन बाबींची अनुकूलता असावी लागते. (१) द्रव्यात बदल न करता त्याद्वारे मानवी गरज भागविता आली पाहिजे किंवा मानवी गरजेच्या दृष्टीने ते सहज बदलता आले पाहिजे. उपलब्ध द्रव्याचा वापर करून घेण्याइतपत मानवी कौशल्य विकसित झाले असले पाहिजे. (३) ऊर्जा वा इतर साधनसंपत्ती रास्तपणे खर्चून हे द्रव्य सहज मिळविता आले पाहिजे. अशा प्रकारे एके काळी आर्थिक दृष्ट्या निरुपयोगी असलेले एखादे द्रव्य तंत्रविद्येचा विकास झाल्यावर मौल्यवान साधनसंपत्ती होऊ शकते.
साधनसंपत्तीच आहे. भौतिक साधनसंपत्तीचे नैसर्गिक व उत्पादित असे आणखी प्रकार होऊ शकतात. सामान्यपणे नैसर्गिक साधनसंपत्तीचे वनस्पतिज, प्राणिज व खनिज असे प्रकार पडतात शिवाय त्यांमध्ये सूर्यापासून मिळणारी ऊर्जा, वातावरण, मृदा वा जमीन आणि पाणी यांचाही समावेश करता येईल. नैसर्गिक साधनसंपत्तीचे पुनःपुन्हा उत्पन्न होऊ शकणारी (उदा., वनस्पती, पाणी, वायू) आणि पुन्हा उत्पन्न न होऊ शकणारी (उदा., खनिजे) असेही प्रकार होऊ शकतात. पुन्हा उत्पन्न न होणारी साधनसंपत्ती ही संचयित असून ती वापराने संपून जाते. उदा., दगडी कोळसा, खनिज तेल इत्यादी. पुष्कळ धातू अशा तऱ्हेने पूर्णपणे संपून जात नाहीत. कारण त्या वापरलेल्या वस्तूंपासून वेगवेगळ्या प्रमाणात परत मिळवून पुन्हा वापरता येतात. पुन्हा उत्पन्न होऊ शकणाऱ्या साधनसंपत्तीला प्रवाही वा अक्षय म्हणता येईल कारण काळजीपूर्वक वापरल्यास ती कायमची राहू शकते. उदा., वनांची योग्य ती काळजी घेतल्यास मूळ साधनसंपत्तीत घट न होता वनातील उत्पादने (उदा., लाकूड, औषधी द्रव्ये, टॅनीन, डिंक, मध इ.) वर्षानुवर्षे उत्पन्न होत राहतील. सूर्यापासून मिळणारी ऊर्जाही अशीच अक्षय आहे परंतु अणुऊर्जा मात्र अमर्याद असली तरी संपू शकेल.
वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीने पृथ्वीवरील साधनसंपत्ती पुरेशी आहे की नाही, हा वादाचा मुद्दा आहे. वाढत्या मानवी गरजा (उदा., कच्च्या मालाची वाढती मागणी) तंत्रविद्येच्या साहाय्याने भागविता येतील, असे आशावादी माणसाला वाटते. उदा., तंत्रविद्येच्या विकासामुळे विरळपणे आढळणाऱ्या साधनसंपत्तीऐवजी विपुल आढळणाऱ्या साधनसंपत्तीचा वापर करता येऊ शकेल मानवी श्रमाऐवजी इतर नैसर्गिक ऊर्जा वापरता येतील पाण्याचा साठा करण्यासाठी मोठी धरणे बांधता येतील तसेच खते, वनस्पतींच्या सुधारित जाती, सिंचाई, यांत्रिक अवजारे इ. वापरून पिकांचे उत्पन्न वाढविता येऊ शकेल भूभौतिक पद्धतींनी खनिजांचे नवीन साठे शोधता येतील. शिवाय खनिज मिळविण्याच्या व त्यांच्या शुद्धीकरणाच्या नवीन सुधारलेल्या पद्धती आणि प्रक्रिया वापरून अधिक प्रमाणात खनिजे मिळविता येतील, असेही आशावादी तज्ञाला वाटते. उलट निराशावाद्यांचे लक्ष युद्धाची विनाशकता, विपुल साधनसंपत्तीचा अ़नुत्पादक वापर, जमिनी नापीक होण्याची क्रिया, जमिनीची वाढती झीज, महापुरांची विनाशकता, संचयित साधनसंपत्तीचा जलदपणे होणारा वाढता वापर इ. गोष्टींकडे जाते.