History, asked by kayandeprashant78, 2 months ago

नकाशा आराखडे यांचा उपयोग काय ​

Answers

Answered by 8e42hetvikesh
1

Explanation:

भुपृष्ठाचे किंवा त्यावरील एखाद्या भागाचे सपाट कागदावर प्रमाणानुसार केलेले आरेखन म्हणजे नकाशा होय.

[१]नकाशा हा एखाद्या जागेचे वा प्रांताचे दृश्य sadrikaran

असते.ज्यात,त्या प्रांतातली ठिकाणे व नैसर्गिक खुणांचा एकमेकांशी संबंध दाखविलेला असतो. बहुतेक नकाशे हे तिन मिती जागेचे स्थिर दोन मिती, भौमितिकरित्या अचूक (वा जवळजवळ अचूक) असे प्रदर्शन करतात. पण आजकालच्या संगणकीय युगात नकाशे हे अंतक्रियाशील (interactive) व तिन मितीही असू शकतात. नकाशे मुख्यत: भुगोलासाठी वापरले जातात पण इतरही प्रदेशांचे उदाहरणार्थ मेंदु, आंतरिक्ष यांचेही नकाशे असू शकतात.

सर्वात जुने सापडलेले नकाशे आकाशाचे (त्यातील तारे व ग्रह यांचे) असले तरी, भुगोलासाठी प्रदेशाचा नकाशा वापरण्याची प्रथा प्राचीनकाळापासून चालत आलेली आहे. नकाशासाठी इंग्रजी शब्द मॅप हा मुळ लॅटिन मधल्या मॅप्पा मुंडी म्हणजे कागदावर किंवा कपड्यावर साकारलेले जग ह्यावरून आलेला आहे. जाधवनगर बलवडी ता.खाणापूर जि. सांगली जगु आण्णा

भौगोलिक नकाशे संपादन करा

नकाशाची दिशा संपादन करा

दिशा ही नकाशाची दुसरी महत्त्वाची बाब आहे. पूर्वीच्या काळी या बाबीला फारसे महत्त्व नसे. अंशतः याच कारणामुळे इसवीसनाच्या तेराव्या शतकापर्यंत नकाशात अचूक दिशा दाखविण्याचा प्रयत्‍न झाला नाही. पुढे होकायंत्राचा शोध लागला, तेव्हा नकाशात अचूक दिशा दाखविणे शक्य झाले.

Answered by ayaaansharma
0

Explanation:

भूपृष्ठावर जी अनेक नैसर्गिक वा मानवनिर्मित वैशिष्ट्ये आढळतात, त्यांपैकी काही वैशिष्ट्यांची सपाट पृष्ठभागावर विशिष्ट चिन्हे आणि खुणा यांनी लहान प्रमाणात केलेली मांडणी. भूपृष्ठावरील अशा गोष्टींचे पारस्परिक स्थान आकृतींच्या द्वारे रेखांकित करणे, हा नकाशाचा मूळ उद्देश असतो. पारस्परिक स्थान त्या गोष्टींतील प्रत्यक्ष अंतरे मोजून व दिशा पाहून नंतर नकाशात व्यक्त केले जाते.

दोन ठिकाणांमधील अंतर दाखविणे, ही नकाशाची पहिली महत्त्वाची बाब आहे. फार पूर्वी हे अंतर वेळेच्या एककात (उदा., अ हे स्थान आ पासून पाच दिवसांच्या अंतरावर आहे.) व्यक्त करीत व वेळेचे हे प्रमाण एकाच नकाशात निरनिराळ्या भागांतील जमिनीच्या उंचसखलपणानुसार निरनिराळे राही. आता मात्र अंतरे लांबीच्या एककातच व्यक्त केली जातात व त्यासाठी जमिनीची नीट मोजणी-मापणी करूनच दोन स्थानांमधील अंतरे नकाशात दाखवितात.

Similar questions