१) नकाशा तयार करताना भूमिती व गणिती पद्धतीचा वापर केला जातो.
Answers
Answer:
Explanation:
नकाशा : भूपृष्ठावर जी अनेक नैसर्गिक वा मानवनिर्मित वैशिष्ट्ये आढळतात, त्यांपैकी काही वैशिष्ट्यांची सपाट पृष्ठभागावर विशिष्ट चिन्हे आणि खुणा यांनी लहान प्रमाणात केलेली मांडणी. भूपृष्ठावरील अशा गोष्टींचे पारस्परिक स्थान आकृतींच्या द्वारे रेखांकित करणे, हा नकाशाचा मूळ उद्देश असतो. पारस्परिक स्थान त्या गोष्टींतील प्रत्यक्ष अंतरे मोजून व दिशा पाहून नंतर नकाशात व्यक्त केले जाते.
दोन ठिकाणांमधील अंतर दाखविणे, ही नकाशाची पहिली महत्त्वाची बाब आहे. फार पूर्वी हे अंतर वेळेच्या एककात (उदा., अ हे स्थान आ पासून पाच दिवसांच्या अंतरावर आहे.) व्यक्त करीत व वेळेचे हे प्रमाण एकाच नकाशात निरनिराळ्या भागांतील जमिनीच्या उंचसखलपणानुसार निरनिराळे राही. आता मात्र अंतरे लांबीच्या एककातच व्यक्त केली जातात व त्यासाठी जमिनीची नीट मोजणी-मापणी करूनच दोन स्थानांमधील अंतरे नकाशात दाखवितात.