Music, asked by riza1122, 9 months ago

नक्षलवादी चळवळ म्हणजे काय ? ​

Answers

Answered by rishika79
14

Answer:

Explanation:

शहरी नक्षलवादी’ असा शिक्का बसलेल्या गौतम नवलाखा या आपल्या जुन्या सहकाऱ्याविषयी बर्नार्ड डी’मेलो यांनी प्रस्तुत लेख लिहिला आहे: [डी‘मेलो हे ‘इपीडब्ल्यू’चे संपादकीय सल्लागार आहेत आणि ‘इंडिया आफ्टर नक्षलबारी: अनफिनिश्ड हिस्ट्री’ (२०१८) हे त्यांचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे].

भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकार आणि हिंदुत्ववादी ‘राष्ट्रवादी’ चळवळ यांनी सांस्कृतिक सनातनी विचारधारेसाठी सुरू केलेल्या राक्षसी वाटचालीला काहीच मर्यादा नसल्याचं दिसतं आहे. सरकारनं राष्ट्रवादी हिंदुत्ववाद्यांच्या चळवळीला पाठबळ देणं आणि तिच्या कृत्यात सहभागी होणं, हे भयावह आहे. मुस्लीम, दडपलेले संघर्षरत राष्ट्रीय समूह व ‘माओवादी’ यांना नियमितपणे लक्ष्य करणाऱ्या भारतीय राज्यसंस्थेनं आपल्या यंत्रणेच्या दहशतीचा वापर करून ‘आवश्यक’ शत्रूंवर नियंत्रण प्रस्थापित करायचा प्रयत्न केला आहे, त्यासाठी अलीकडच्या कारवायांमध्ये (जून व ऑगस्ट २०१८) ‘शहरी नक्षलवाद’ असा एक प्रवर्गच निर्माण केला आहे. सरकारच्या वर्गीकरणानुसार ‘शहरी नक्षलवाद्यां’मध्ये आत्तापर्यंत वकील, मानवाधिकार कार्यकर्ते, कवी, लेखक, पत्रकार व प्राध्यापक आणि (माओवादी) भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ‘सक्रिय सदस्य’ यांचा समावेश राहिलेला आहे.

ऑगस्टमध्ये पकडण्यात आलेल्या पाच व्यक्तींवर इतर फौजदारी कायद्यांसोबतच ‘बेकायदेशीर कृत्यं (प्रतिबंधक) अधिनियमां’तर्गत आरोप लावण्यात आले. या ‘शहरी नक्षलवाद्यां’ची व सरकारला छळ करायचा होता अशा आणखी काही जणांची घरं वा कार्यालयं यांवर छापे टाकण्यात आले. भारतातील प्रस्थापित व्यवस्थेशी संगनमत असलेल्या काही माध्यमांनी अटक झालेल्या व्यक्तींवर निर्लज्जपणे आरोप करत वृत्तवाहिन्यांवरून धाकदपटशाही करायला सुरुवात केली. अटक झालेल्या व्यक्तींची निंदानालस्ती व नाचक्की व्हावी, या उद्देशानंच ही कारवाई झाल्याचं यातून स्पष्ट होतं. यातील काही ‘दोषीं’वर तर जाहीररित्या ‘देशद्रोही’, ‘राष्ट्राचे अदृश्य शत्रू’ , आणि ‘माओवाद्यांना सहाय्य करणारे व भारतीय लोकशाहीला गंभीर धोका असलेले लोक’ असे शिक्के मारण्यात आले.

या ‘राष्ट्राच्या अदृश्य शत्रूं’मध्ये व ‘भारतीय लोकशाहीला असलेल्या गंभीर धोक्यां’मध्ये ‘इकॉनॉमिक अँड पॉलिटीकल वीकली’चे विख्यात पत्रकार गौतम नवलाखा यांचाही समावेश आहे. नवलाखा १९८०च्या दशकाच्या सुरुवातीला ‘इपीडब्ल्यू’मध्ये रुजू झाले. रजनी देसाई, एम.एस. प्रभाकर व कृष्ण राज यांसारख्या भारतातील सर्वोत्तम पत्रकारांमध्ये गणना होणाऱ्या व्यक्तींसोबत नवलाखा यांनी काम केलं. त्यानंतर १९८०च्या दशकाच्या उत्तरार्धात त्यांनी आपला निवास दिल्लीला हलवला, तरीही ‘इपीडब्ल्यू’सोबत ते काम करतच होते. त्यांना संपादकीय सल्लागाराचं पद देण्यात आलं. २००६ सालपर्यंत ते या पदावर कार्यरत होते, त्यानंतर मात्र त्यांनी या औपचारिक जबाबदारीतून आपल्याला मुक्त करावं अशी विनंती केली आणि त्यानुसार तत्कालीन सी. राममनोहर रेड्डी यांनी कार्यवाही केली. ‘पीपल्स यूनियन फॉर डेमॉक्रेटिक राइट्स’ या संस्थेसोबत लोकशाही अधिकार कार्यकर्ता म्हणून ते कार्यरत राहिलेले आहेत आणि या कामामध्ये त्यांना अधिक वेळ द्यायचा होता. पण, तरीही ‘इपीडब्ल्यू’मधील त्यांचं लेखन सुरूच राहिलं.

Hope it helps you.....

Answered by Anonymous
43

नक्षलवाद ही भारतातील कडव्या साम्यवादी संघटनांनी चालविलेली सशस्त्र चळवळ आहे. गरीब शेतमजूर आणि आदिवासींच्या दुर्दशेस सरकारचे भांडवलशाही धोरण कारणीभूत असून त्याचा विरोध माओ ने दाखवून दिलेल्या सशस्त्र क्रांतीच्या मार्गानेच करता येईल ही नक्षलवाद्यांची विचारसरणी आहे

Similar questions