Geography, asked by mdmayekar90, 5 hours ago

नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न नाक नाही नतिला भोक पाडा भीतिला याचा अर्थ स्पष्ट करा​

Answers

Answered by 1034priyanshi
1

नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्ने’ ही म्हण राज्य मिनी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धाबाबत तंतोतंत खरी ठरली आहे. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेतर्फे (एमओए) आयोजित केल्या जाणाऱ्या या स्पर्धेच्या संयोजनात नियमितपणा राहिलेलाच नाही. सतरा-अठरा वर्षांनी ही स्पर्धा पुन्हा सुरू होणार असे वाटले असतानाच त्यात अनेक अडचणी येऊ लागल्या आहेत.

राज्यातील क्रीडा क्षेत्रात नैपुण्य शोध व्हावा व या नैपुण्यास राष्ट्रीय स्तरावर विकासाची संधी मिळावी या हेतूने १९८९-९० मध्ये राज्यात मिनी ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रामुख्याने ऑलिम्पिक क्रीडा प्रकार व देशी खेळांच्या स्पर्धाचा त्यामध्ये समावेश करण्यात आला. पहिली स्पर्धा ठाणे येथे अतिशय उत्साहात घेण्यात आली. त्यानंतर सोलापूर येथे १९९०-९१ मध्ये तेथील महानगरपालिकेने स्पर्धेच्या खर्चाची बाजू उचलली. त्यानंतर अमरावती, सांगली व पिंपरी चिंचवड येथे या स्पर्धेचे आयोजन केले गेले. पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेने १९९५-९६ मध्ये शिवछत्रपती क्रीडानगरीत अतिशय भव्य स्वरूपात ही स्पर्धा घेतली. त्या वेळी त्यांनी जवळजवळ एक कोटी रुपये खर्च केला होता. त्या स्पर्धेचे भव्य संयोजन पाहून नंतर तशा स्वरुपात स्पर्धा आयोजित केली गेली पाहिजे असा क्रीडा संघटकांमध्ये सूर दिसून आला. मात्र हे शिवधनुष्य पेलविणार कोण हीच समस्या निर्माण झाली व या स्पर्धेस खंड पडला. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धापूर्वी राज्याचा संघ निवडण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली जावी अशी अपेक्षा होती, मात्र राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या संयोजनास विलंब होऊ लागला व आपोआपच राज्य मिनी ऑलिम्पिक स्पर्धेबाबतचा उत्साहदेखील मावळला.

या स्पर्धेची जबाबदारी नेमकी कोणाची हादेखील चर्चेचा विषय झाला होता. स्पर्धेच्या तांत्रिक संयोजनाची संपूर्ण जबाबदारी एमओएची तर आर्थिक बाजू राज्याचे क्रीडा व युवक संचालनालय उचलत असते, असे राज्याचे क्रीडा संचालक नरेंद्र सोपल यांनी सांगितले.

This is your answer

Similar questions