History, asked by prathyusha8252, 11 months ago

नळदुर्ग या विषयावर अहवाल सादर करा ?

Answers

Answered by khushisharmah03
2

Answer:

नळदुर्ग हा महाराष्ट्रातील भुईकोट किल्ल्यातील सर्वांत मोठा किल्ला आहे. याची तटबंदी जवळजवळ ३ कि.मी. लांब पसरलेली आहे. या तटबंदीत ११४ बुरूज आहेत. महाराष्ट्राच्या गिरिदुर्ग, जलदुर्गांबरोबरच अनेक वैशिष्ट्यपूर्ण भुईदुर्ग किंवा भुईकोट किल्ले आहेत. या भुईकोट किल्ल्यांमध्ये महत्त्वाचा असा किल्ला म्हणजे नळदुर्ग होय. सदर किल्ला हा महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाचे संरक्षित स्मारक आहे.

यामध्ये हिंदु धर्माच्या काही मंदिरांचा सुध्दा समावेश आहे जसे की गणपती महाल, लक्ष्मी महाल हे पाहण्यासाठी आकर्षक आहेत.येथे धबधबा आहे त्यासाठीहि हा किल्ला प्रसिद्ध आहे

नळदुर्ग किल्ला हा उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तुळजापूर तालुक्यात आहे. पुणे - हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गावर नळदुर्ग आहे. सोलापूरकडून हैदराबादकडे निघाल्यावर ५० कि.मी. अंतरावर नळदुर्ग गाव लागते. तसेच हे नाव निजामशाही काळात देण्यात आले. नंतर नळ राजाने हा किल्ला काबीज केला व आलीयाबाद चे नाव बदलून नळदुर्ग हे नाव ठेवण्यात आले.

Similar questions