नमुना कृती:
माझे बालपण या विषयावर पुढील मुददे लक्षात घेऊन प्रसंग लेखन करा.(आजीच्या गोड आठवणी, जुन्या आठवणींना उजाळा,
माझ्या मित्रासोबत, विहीरीत उतरण्याचा अनुभव).
Answers
Answer:
“बालपण” या जगातली सगळ्यात सुंदर आठवण, बालपण म्हणाले कि पकडापकडी, खो-खो पासून अगदी विडीओ गेम, क्रिकेट पर्यंत सगळे विषय आठवतात. शाळेत केलेला दंगा, सुटीत केलेली मस्ती, गावाला केलेली मजा, आणि त्या बद्दल खाल्लेला मार सगळे काही नीट आठवते, कारण ते दिवस असतात सोनेरी.
“बालपण दे रे देवा, मुठी गोड साखरेचा रवा” उगीच नाही म्हणत. ते आयुष्य म्हणजे खूप छान आणि गोड, जिथे स्वार्थ नसतो, खोटेपणा नसतो, फसवेगिरी नसते, अभिमान नसतो. बालपण म्हणजे आयुष्यातला सगळ्यात सुंदर काळ, ना काळजी, ना चिंता..!! बालपण म्हणजे फक्त मज्जा असे माझे समीकरण होते, त्यात घरात सगळ्यात लहान म्हणून खूप लाड झालेच. आजकालच्या मुलांना बघून वाटते त्यांचे बालपण हरवले… कारण खूप लहान वयात ते खूप जास्त व्यस्त दिसतात. प्रचंड अभ्यास, सगळे क्लासेस. आजकाल आमचा सोसायटी मध्ये आमचा सारखी खेळणारी मुळे फक्त मे महिन्यात दिसतात, त्यात पण काही जण तेव्हा गावी जातात. शाळेत जतन त्याच्या वजनापेक्षा दप्तराचे वजन जास्त असते. आज काल स्पर्धा पण एवढी वाढली आहे कि लहान मुलांनी त्यांचे लहानपण हरवले आहे असे वाटते.
लहानपणी पप्पाना ओफ़िस् ला जाताना पहिले कि असे वाटायचे कधी एकदा मोठे होऊ, अणि हातात ब्याग घेउन कामाला जाऊ…..?? अणि आता वाटते, का आपण मोठे झालोत? लहानपनी काही पण करा, काही पण बोला,…. कोणी काहीच बोलत नाही, आता मोठे झाल्यावर कळते कि लहानपण किती गोड असते. माझा लहानपनी मी खुप धमाल केलि आहे, त्यातले काही क्षण माला तुम्हाला सांगायला मज्जा येइल…..,
१) आमचा सोसायटी मधे आमचा सगळ्यात मोठा ग्रुप होता, आम्ही रोज काही तरी नविन वाटेल असे गेम खेलायाचो…., अणि त्यात सगळ्यात मोठी मीच, त्यामुळे खुप धमाल यायची, जसे कधी सायकलची रेस, कधी क्रिकेट, कधी खो-खो, असे बरेच गेम खेळायचो,. क्रिकेट खेळताना मी सगळ्यात पहिले माझाच घराची काच फोडली होती, नंतर एकदा पहिल्या मजल्यावर रहाणाऱ्याची काच फोडली होती….. असे किती तरी वेळा काचा फोडून, घरातून पैसे काढून सगळ्यांचा काचा परत बसवून द्यायचो. माझा घराला जेवढ्या काचा होत्या त्या सगळ्या काचा मी जवळ जवळ २-३ वेळा फोडून परत बसवल्या
२) मी शाळेत खुप शांत बसायची, माझे शाळेत जास्त मित्र मैत्रीण नव्हते, मी शाळेत रोज पाण्याची बोटल घेउन जायची, एके दिवशी मला एकाने मस्करीत सांगितले की तू उद्या १ लीटर पाण्याची बोटल घेउन ये, अणि मी खरेच घेउन गेली होती……. अणि मधली सुट्टी झाली तेव्हा ती पाण्याची बोटल एका मुलीने मागितली, तिने पानी पिउन झाल्यावर ती मला परत करण्यासाठी माज़ा बाजुचा बेंच वर बसलेल्या मुलाजवळ फेकली, मी त्याला बोली दे मला, मी ठेवून देते बोटल… त्याने माझे ऐकले नाही अणि ती बोटल मला न देता तो अणि त्याचा मित्र क्याच-क्याच खेळत होते, ते पण शेवटचा बेंच वरुण पहिल्या बेंच वर, मी बोली नको खेलूस, काही झाले तर माझे नाव येइल म्हणून, त्याने ऐकले नाही अणि तो खेळत राहिला. शेवटी त्याने खेलता खेलता एका मुलाचा चस्मा फोडला, त्या मुलाने पाहिले होते कोणी फोडला पण त्याने मात्र टिचरला एवडेच सांगितले की माज़ा चस्मा या बोटल मुले फुटला, टिचरने विचारले की कोणाची बोटल आहे ही, अणि सगाल्यानी मिळून बोट माझा कड़े दाखवले, अणि मी काही बोलायचा आधीच त्यानी मला सरळ प्रिन्सिपल च ऑफिस मधे नेले, त्यानी मला सांगितले की तुला याचा चस्मा भरून द्यावा लागेल, मी बोली मी का भरू जो मी फोडलाच नाही???? ते बोलले ,उद्या आई बाबा न घेउन ये शाळेत, तय नंतर मी 3 दिवस शाळेतच नाही गेली, ४ थ्या दिवशी माजी चुलत बहिन सीमा ला सांगितले की कांचन च आई बाबाना बोलावून आन शाळेत, तिने सांगितले आम्ही तिचा आई बाबाशी बोलत नाही जे खोटे होते……. मग त्याच दिवशी तिने मला येउन सांगितले की त्याने नविन चस्मा बनवला आहे, मग मी शाळेत गेली…….
३) आमचा घरात १ मामा आहे, ज्याला मी, माझे आई बाबा, माझा दादा आम्ही सगलेच त्याला मामा बोलतो….. अणि लाड़ाने मामू बोलतो, तो जेवण जाले की आम्हाला घेउन मैदानात जायचा, जाताना सोबत चटाई घेउन जायचो ( बसायची सोय म्हणून )…….. आम्ही घरी मिळून क्यारम खेलायचो….. तेव्हा मी अणि पप्पा पार्टनर अणि मामू अणि आनंद (माझा भाऊ) पार्टनर, अणि नेहेमी पप्पा अणि मीच जिन्कयाचो तर हे दोघे जिन्कन्यासाठी चीटिंग करायचे, उदाहरण म्हणजे मामाचा डाव आला की मामा उजव्या हातात स्ट्रायकर पकडून, पप्पाना काही तरी सिरिअस गप्पा काढल्या सारखे मग्न करून किव टीवी मधे काय मस्त दाखवत आहे बघा बोलायचा अणि पप्पाचे अणि माझे लक्ष दूर करून डाव्या हाताने १ सोंटी पोक्केट मधे टाकुन द्यायचा…….. आम्ही त्याला नेहेमी पकदयाचो पण तो एवढा निरागस चेहरा करून बोलायचा की नाही मी कशी चीटिंग करेन????? तुमचे लक्ष नाही खेळात …. मगाशी पण एवढ्याच सोंगट्या होत्या क्याराम वर….. आणि बोलताना पण असे तोंड करून बोलेल कि तुम्ही शंका पण घेणार नाही कि हा खोटे बोलत असेल म्हणून….. हेहेहेहेहेहे
४) मी आणि माझी मैत्रीण अनघा, आम्ही एकाच शाळेत आणि क्लास मध्ये होतो, आम्हाला मुलांशी भांडायला, त्यांची टांग खेचायला जाम आवडायचे….. तर आम्ही क्लास मध्ये एकदा किरण नावाचा मुलाला पिडले होते नेहेमीप्रमाणे, आणि त्यावेळी सायकल चे भूत सावर होते माझावर, आणि नेमकी किरण ने त्या दिवशी सायकल आणली होती, मी त्याला बोली मला सायकल चालवायची आहे, तो मला बोला तू तर नेहेमी चालवते, आज अनघा ला घेऊन डबल सीट ट्राय कर, मी खुशीने हो बोली आणि अनघा पण तयार झाली बसायला आणि या हिरोने मला ब्रेक निघालेल्या सायकल वर बसवले, मी मस्त मोठी फेरी मारली मैदानाला, आणि थांबायचा वेळी ब्रेक दाबला तर काय????? सरळ दोघी पण कचरा पेटीत जाऊन पडलो,…………. (आणि किरण आनंद लुटत जोरजोरात हसत होता) कारण त्याला मी आणि अनघा कधी सुखाने बसू देत नव्हतो.