India Languages, asked by sky1001, 10 months ago

नमस्कार आज तुमच्यासाठी आणखी एक कोडे आणले आहे . आज तुम्हाला मी खाली दिलेल्या प्राणी आणि पक्ष्यांवरुन मराठी । म्हणी सांगायच्या आहेत . म्हणी मराठीच पाहिजे . हिंदी नको . १ ) वाघ २ ) हत्ती ३ ) घोडा ४ ) कोल्हा ५ ) सुसर ६ ) बकरी ७ ) कुत्रा ८ ) म्हैस ९ ) गाय १० ) बैल ११ ) मांजर १२ ) उंदीर १३गाढव १४ ) कावळा १५ ) साप १६ ) कोबडा १७ ) उंट १८ ) गोगलगाय​

Answers

Answered by shalakaanturkar
2

Answer:

वाघ=

हत्ती=हत्ती गेला शेपूट राहिले.

घोडा=घोड मैदान जवळ आहे.

कोल्हा=कोल्हा काकडीला राजी.

सुसर=सुसरबाई तुझी पाठ मऊ.

बकरी=

कुत्रा=आंधळा दळतोय कुत्रा पीठ खातोय.

म्हैस=अग अग म्हशी मला कुठ नेशी.

गाय=दुभत्या गाईच्या लाथा गोड.

बैल=बैल गेला झोपा केला.

मांजर=मांजरीच्या गळ्यात घंटा कोण बांधणार.

उंदीर=उंदराला मांजर साक्ष.

गाढव=गाढवाला गुळाची चव काय?

कावळा=कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही.

साप=आयत्या बिळात नागोबा.

कोंबडा=कोंबडा झाकला तरी दिवस ऊजाडायचा राहत नाही.

उंट=उंटावरून शेळ्या हाकणे.

गोगलगाय=गोगलगाय नि पोटात पाय.

Similar questions