नटसम्राट चित्रपट कोणी लिहीला
Answers
वि. वा. शिरवाडकर लिखित नटसम्राट या नाटकावर आधारीत ‘नटसम्राट... असा नट होणे नाही’ हा चित्रपट आहे. नाटक आणि चित्रपट यांत जमीन-आस्मानाचं अंतर असतं. चित्रपटाचं माध्यम भव्य आहे. नाटकाला काही मर्यादा असतात. पण मर्यादा हेच नाटकाचं वैशिष्ट्य असतं. त्या मर्यादेत राहून केवळ एका रंगमंचावर तुम्हाला अखंड विश्व उभं करायचं असतं. म्हणून चित्रपट व नाटक ही दोन वेगवेगळी माध्यमं आहेत. यात श्रेष्ठत्व कुणालाच बहाल करता येत नाही. दोन्ही माध्यमं आपापल्या जागी ठामपणे उभी आहेत. तुम्ही जर नटसम्राट हे नाटक पाहिलं असेल, तर ते काही वेळेसाठी विसरुन ‘नटसम्राट... असा नट होणे नाही’ हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात प्रवेश करावा. त्यामुळे नाटकात असं दाखवलं होतं, चित्रपटात असं नाही दाखवलं. नाटकातले अप्पासाहेब वेगळे होते, चित्रपटातले वेगळे आहेत, वगैरे वगैरे अशी तुलना करणं कटाक्षानं टाळलं जाईल. मुळात नाटक आणि सिनेमाची तुलना होऊ शकत नाही. ८ - १० प्रवेशात तुम्हाला नाटक मांडायचं असतं. चित्रपटांत अनेक सीन्स असतात. चित्रपटाला पटकथा असते. म्हणून मूळ नाटकाचा गाभा हरवून न देता नव्याने पटकथा मांडण्यात आली आहे. स्टोरी लाईनमध्ये म्हणजेच मूळ कथानकामध्ये हलकासा बदल करण्यात आलेला आहे. चित्रपटात दोन नवे प्रमुख पात्र घेण्यात आलेले आहेत. एक सिद्धार्थ, जो आपली विदेशातली प्रशस्त नोकरी सोडून नाटकाच्या वेडाने भारतात परततो, दुरसं पात्र म्हणजे राम अभ्यंकर जो नटसम्राट अप्पासाहेब बेलवकरांचा मित्र आहे व स्वतः एक उत्कृष्ट नट आहे. पण नशीबाने या नटाला साथ दिली नाही.
Vishnu Vaman Shirwadkar