Hindi, asked by saurabhtiwari8642, 1 month ago

नदी कशी पळते? answer​

Answers

Answered by salonimahad
1

नदी वारा सारखी वाहत असते

Answered by brindajani0212
0

Answer:

नदीचा उगम विविध प्रकारे होतो. त्यामध्ये जलाशय, झरे, प्रचंड मोठ्या दलदलीच्या जागा आणि बर्फाची पठारे यांचा समावेश होतो. बहुतेक सगळ्या नद्यांना उपनद्या, ओढे, नाले येऊन मिळतात. हेच नद्यांचे पाणी वाहते असण्याचे प्रमुख स्रोत असतात. काही वेळा भूगर्भातील पाणीही झऱ्यांद्वारे नदीत येऊ शकते. नदीच्या वाहत्या पाण्यात नदीपात्रातील [खडक], वाळू व सच्छिद्र जमीन यांतील पाणीही सामील असते. अनेकदा दरीतून वाहणारी नदी पात्रावरून लहान दिसली तरी तिच्यात मोठ्या प्रमाणात पाणी असू शकते.

नद्या सर्वसाधारणपणे उगमापासून सुरुवात करून, उताराकडे वाहात जातात व समुद्रास जाऊन मिळतात. काही प्रसंगी सूर्याच्या उष्णतेने बाष्पीभवन होऊन नद्या मध्येच संपू शकतात. काही वेळा नदीतील पाणी जमिनीतील भेगांमध्ये झिरपून जाऊ शकते, आणि नंतर भूगर्भातील पाणी बनते. प्राचीन भारतातील सरस्वती नदी भूगर्भात अशीच लुप्त झाली आहे. या शिवाय शेती आणि औद्योगिकीकरणामुळे होणारा नदीच्या पाण्याचा उपसाही नदी आटवू शकतो. धरणे नदी रोखून धरतात, व त्यामुळे धरणाखालील काही भागातले पात्र आटून जाते

Explanation:

Similar questions