Hindi, asked by aditiyadav431, 7 months ago

नदी,प्रेम, आनंद, बालपण, पाऊस, निसर्ग, फुलपाखरू,आजी आजोबा.

वरील कोणता ही एक शब्द घेऊन त्या शब्दावर कविता तयार करा
this request please do fast​

Answers

Answered by XxMissPaglixX
2

पाऊस गाणे

पाऊस आला, पाऊस आला

आला संगे वारा

पाऊस येता भारूनी जाई

आसमंतही सारा

गडगड करूनी मेघ सावळा

नाद अंबरी भरतो

सौदामिनीचा प्रकाश पसरूनी

अवनीवरती येतो

पाऊस येता हर्ष होऊनी

रिमझिम गाणे गातो

स्वैर होऊनी मयूर कसा हा

नृत्य काननी करतो

तरू-वेलींवर कळय़ा फुलेही

डुलती आनंदात

भिजता-भिजता वा-यासंगे

पाऊस गाणे गात

पाऊस येता भिजलेल्या

मातीचा पसरे गंध

सुचते मजला नकळत तेव्हा

गीत असे स्वच्छंद

अमेय गुप्ते, दादर

нορє iτ нєℓρѕ γου.

τнαиκ γου

Similar questions