Chemistry, asked by bhoyeyogesh2003, 1 year ago

३) नदी प्रदुषण थांबविण्यासाठीचे वेगवेगळे उपाय १० ते १५ ओळीत लिहा.​

Answers

Answered by omkarnakate2007
0

Explanation:

औद्योगिक वसाहती व कारखान्यांतील रासायनिक पदार्थ कोणत्याही प्रक्रियेविना नदी/नाले व इतर जलस्रोतांमध्ये सोडले जातात.

नदीत कपडे/गुरे धुणे,अंघोळ करणे, भांडी घासणे यामुळे जलप्रदूषण होते.

रासायनिक प्रक्रिया केलेले पाणी पाण्यात मिसळल्याने पाण्यातील मासे मृत पावल्याने पाणी मोठ्या प्रमाणात दूषित होते.

जल प्रदूषणाला शहरीकरण, आणि शहरातील अपुरे सांडपाणी व्यवस्थापन हे महत्वाचे कारण आहे. तसेच रोजच्या वापरातील शरीर स्वच्छता आणि घराची स्वच्छता यासाठी वापरण्यात येणारी विविध रसायने यांचा महत्वाचा भाग आहे.

औद्योगिक रासायनिक पदार्थ पाण्यात सोडण्याने

● सांडपाणी मैलापाणी जलाशयात सोडल्याने, Fyydt ● रासायनिक खते, कीटकनाशके पाण्यात मिसळल्याने,

● पाण्यातील जीव मृत होऊन कुजल्याने,

● कचरा किंवा तत्सम पदार्थ पाण्यात टाकल्याने,

● जनावरे, कपडे, भांडी नदीच्या ठिकाणी धुतल्याने, मृत जनावरे नदीत टाकल्याने,

● रासायनिक रंगकाम केलेल्या आणि प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनविलेल्या मूर्तींच्या विसर्जनामुळे पाण्याचे प्रदूषण होते.

● जलप्रदूषणामुळे पाण्यामध्ये जीवाणूंची उत्पत्ती होत असे जीवाणूयुक्त पाणी पिल्याने अनेक रोग उत्पन्न होतात. यामध्ये अतिसार (हगवण), उलटी, कावीळ, विविध प्रकारचे ताप, पटकी, मलेरिया, खोकला, सर्दी यांसरखे विकार होतात.

● रासायनिक पदार्थयुक्त पाणी सेवन केल्यास त्यांचा अत्यंत वाईट परिणाम आपल्या किडन्यांवर होतो. किडन्या निकामी होणे यासारखे गंभीर व्याधी उत्पन्न होतात.

Similar questions