नदी व झाड एकमेकांशी बोलत अशी कल्पना करून त्यांच्यातील संवाद थोडक्यात लिही .
Answers
Answer
नदी : काय रे झाड दादा. कसा आहेस तू? तब्येतपाणी ठीक ना?
झाड : हो गं नदीताई. तुझ्या कृपेने सारं ठीक आहे. तुझ्या पाण्यात माझी मुळे टाकून मी लागेल तेव्हा निवांत पाणी पीत बसतो. हिरवा हिरवागार राहतो मी, तो तुझ्या मुळेच!
नदी : अरे! तू माझ्या काठी आहेस, म्हणून तुला पाणी मिळतंय बरं! पण दुष्काळी भागातील तुझ्या मित्रांना कुठे रे पाणी मिळेल!
झाड : हो ना! नदीताई, तू जीवनवाहिनी आहेस आमची! तुझ्यामुळेच तर आपला
परिसर असा समृद्ध आह
नदी : अरे, त्यात माझं कसलं आलंय कौतुक! माझा स्वभाव आहे तो, सतत वाहण्याचा! त्यामुळे मी झुळझुळ वाहत राहते. जिथे जाते, तिथे पाणी घेऊन जाते.
झाड : तुझ्या असण्याने सर्वांना पाणी मिळतं बघ. तू बारा महिने वाहत असतेस. त्यामुळे लोक, प्राणी-पक्षी सगळे आनंदाने तुझ्याजवळ येतात. तुझे पाणी पिऊन तृप्त होतात. पाण्याचा वापर करतात.
नदी : हं. तूही किती परोपकारी आहेस, झाडदादा. आपल्या प्रत्येक अवयवाचा वापर तू लोकांसाठी, पक्षी-प्राण्यांसाठी करतोस. कोणी तुझ्याशी वाईट वागो किंवा चांगले, तू सतत त्यांना मदतच करतोस.
झाड : अगं ताई, तुझ्याकडूनच तर शिकलो सर्वांना मदत करण्याचा गुण! 'ताई' आहेस तू माझी. छोट्या भावाला चांगले संस्कार देणारी. (दोघेही हसतात.)
Hey buddy,
if it helped you please mark me as brainleast
Answer:
एकदा एक नदी जंगलातून वाहत असताना ती एका झाडाला भेटते तेव्हा त्यांच्यात खालील प्रमाणे संवाद होतो:
नदी: काय रे दादा कसा आहेस?
झाड: मी मजेत. तू कशी आहेस?
नदी: मी पण मजेत आहे दादा. आज तू खूप टवटवीत दिसत आहेस.
झाड: हो ताई. आता पावसाळा सुरु झाला त्यामुळे तू जास्त पाणी आणायला लागली. तुझे थंडगार पाणी पिऊन पोट चांगले भरले.
नदी: हो ना. यावर्षी पाऊस चांगला पडायला लागल्या मुळे माझे पाणी वाढले व तुझ्या सारखे इतर सजीव ही सुखावले.
झाड: म्हणूनच तर आम्ही सगळे तुला जंगलाची जीवनदायिनी म्हणतो.
झाड: असं काही नाही रे दादा. आपण सगळेच एकमेकांचे पलांकर्ते आहोत. पृथ्वीवरील प्रत्येक सजीव हा इतर कोणत्यातरी सजीवावर अवलंबून आहे.
झाड: अगदी बरोबर बोललीस बघ ताई. आपण एकमेकांवर अवलंबून असल्यामुळेच अन्नसाखळी संतुलित आहे.
नदी: चल दादा आता मी जाते पुढे. पुढच्या जंगलात सुद्धा अनेक सजीव माझी वाट पाहत आहेत.