नदी व झाड या दोघांमधील संवादाची कल्पना करून सवादलेखन करा .
Answers
Answer:
नदी व झाड या दोघांमधील संवाद
नदीः मी अशी खळखळ वाहते ना तेव्हा मला खूप आनंद होतो कारण माझ्यातील वाहणाऱ्या पाण्याने अनेक प्राण्यांची आणि पक्ष्यांची तहान पूर्ण होते.
झाडः खरंच फक्त प्राणी आणि पक्षी नाही तर या भूतलावरील प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी पाण्याची गरज असते. आम्ही झाडेच बघ ना. आमचं पूर्ण सौंदर्य हे तुझ्या वाहणार्या पाण्यावरच अवलंबून असते.
नदीः काही वर्षांपूर्वी या पृथ्वीतलावरील प्रत्येक नदी ही खळखळून वाहत होती. आणि फक्त पावसाळ्यातच नव्हे तर बाराही महिने नदी ही पृथ्वी तलावावरील सजिवांचे मन तृप्त करत होती.
झाडः पण माणसाच्या स्वार्थी वृत्ती मुळे आम्हा झाडांची कत्तल झाली आणि त्याचा परिणाम म्हणजे निसर्गातील सर्व ऋतूंचा कालावधीच बदलला. झाडांची कत्तल झाली आणि त्यामुळे पावसाळ्यात देखील पाऊस पडत नाही आणि त्याचाच परिणाम म्हणजे नदी पहिल्या सारखी वर्षभर वाहत नाही.
नदीः एवढेच नाही तर मनुष्याच्या लोभापायी अनेक कारखान्यांची निर्मिती झाली आणि त्या कारखान्यातून निघणाऱ्या रासायनिक द्रव्याने नदीचे पाणी खराब झाले.
झाडः पूर्वी नदीला आई समान पुजले जायचे पण आज त्याच नदीत प्लास्टिक, रासायनिक पदार्थ फेकून तिची पवित्रता कमी केली.
नदीः मनुष्य जर असाच वागत राहिला तर लवकरच त्याचे पृथ्वीतलावरचे अस्तित्वच धोक्यात येईल. कारण मनुष्याचे अस्तित्व हे नदीचे आणि झाडांच्या अस्तित्वावर खूप मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. जर नद्याच नसतील तर पाणी कुठून येणार आणि झाडच नसतील तर शुद्ध हवा कशी मिळणार.
झाडः पृथ्वी तलावरील सजीवांच्या अस्तित्वासाठी नदीतील पाणी आणि जमिनीवरील झाड हे वाचवलेच पाहिजे.