नदी या विषयावर 150 ते 200 निबंध लिहा
Answers
Answer:
150 nibandh we can't write
Explanation:
mark me brain list if the sentence is true
Explanation:
आज सुट्टी होती म्हणून मी आमच्या गावाशेजारून वाहणारी नदी “वंदिता” शेजारी जाऊन बसलो होतो. माझे हितगुज आणि अडीअडचणी मी नदीला सांगत असतो. कारण मला असे वाटते की नदी शांतपणे सर्व ऐकून घेत असते. अशा नदीकिनारी मी बसलो असतानाच कुठून तरी आवाज आला. नमस्ते! असे म्हणत कोणतरी बोलले परंतु शेजारी कोणीच नसल्याने मी अगोदर घाबरलो. ‘ मी वंदिता नदी ‘ असे म्हणत नदीच माझ्याबरोबर बोलू लागली होती.
तू माझ्याबरोबर सारखा बोलत असतोस त्यामुळे मी देखील माझी आत्मकथा आज सांगणार आहे. तुझे मन साफ आहे तू माझी भावना समजून घेशील अशी आशा करते आणि माझे दुःख दूर करण्यासाठी नक्की प्रयत्न करशील, असे मला वाटते.
मी जवळजवळ सहाशे वर्ष झाली इथून वाहत आहे. माझा आकार लहान असला तरी माझा उगम आणि वाहणे सतत आहे. सह्याद्रीच्या डोंगररागांमध्ये माझा उगम आहे. तेथून वाहत येत मी कृष्णा नदीला मिळते. पूर्वी घडलेल्या या विभागातल्या सर्व कथा आणि इतिहास मी जाणून आहे. माणसाच्या मनात निसर्गाबद्दल असलेली असूया कमी होत चालली आहे त्यामुळे मला तुझ्याशी आज बोलायचे आहे.
जेवढी गावे माझ्या किनाऱ्यावर वसलेली आहेत त्यांना सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. पूर्वी जरी शेती हा उपजीविकेचा मार्ग असला तरी लोकसंख्या कमी असल्याने माझे पाणी प्रमाणात आणि योग्य प्रकारे वापरले जायचे. निसर्गाकडून मला सतत वरदान मिळत आले आहे. माझे पाणी वर्षभर आटत नव्हते.
पावसाळ्यात इतका पाऊस पडायचा की सर्व प्राणी मात्रा आणि झाडे हुरळून जायची. हिरवी शाल पांघरावी अशी काही या परिसराची अवस्था व्हायची. माझे पाणी दुथडी भरून वाहत असे. या सहाशे वर्षात मी तब्बल नऊ वेळा दुष्काळाचा सामना केलेला आहे. परंतु निसर्गाची साथ होती आणि मानवी कृत्ये निसर्गाविरोधात नव्हती.
आत्ता माझे पाणी बघतोयस किती कमी आहे. अजुन तर उन्हाळापण सुरू नाही झाला. उन्हाळयात माझे सर्व पाणी आटून जाते. पूर्वी धरण बांधण्याच्या अगोदर असे कधी होत नव्हते. मानवी विकास म्हणून तुमच्या अहंकार आणि स्वार्थासाठी तुम्ही माझा आणि अनेक नद्यांचा प्रवाह रोखला अशाने धरणाशेजारी मी डबके म्हणून जिवंत आहे.
माझ्या शेजारी जी गावे आहेत त्यांनी आधुनिक शेती करून स्वतःचा विकास करवून घेतला परंतु माझे हाल पाहिलेत का? माझे पाणी नुसते उपसून हव्यासापोटी शेती सुरू झाली आहे. कष्टाचे आणि निसर्गाचे महत्व आज कोणी जाणत नाही. फक्त खोटी श्रीमंती मिळवण्यासाठी माझे पाणी पाटबंधारे आणि नाल्यांद्वारे इकडे तिकडे फिरवण्यात आले. परंतु माझा नैसर्गिक प्रवाह आणि नैसर्गिक पावसाचे चक्र यात बाधा आणली.
वाहणारे पाणीच स्वच्छ असते. त्यामुळे मला वाहू द्या. मी वाहल्यावर माझे उद्दिष्ट पूर्ण होत जाईल. लोकसंख्या वाढ आणि जलप्रदूषण या गंभीर दोन समस्या आहेत ज्यामुळे माझे आणि पर्यायाने निसर्गाचे, या धरतीमातेचे नुकसान होत आहे. लोकसंख्या वाढल्यामुळे कचरा वाढला. सुयोग्य व्यवस्थापन नसल्यामुळे सर्व कचरा आणि रसायने माझ्यात मिसळली जाऊ लागली. माझा प्रवाह रोखल्यामुळे आणि जलप्रदूषण झाल्यामुळे मी दूषित झाले आहे.
पूर्वी माझे पाणी प्यायले जायचे. सर्व ठिकाणी पवित्र मानले जायचे पण आता बघ या पाण्याकडे! पिशील का तू? अशा पाण्यामुळे अनेक जंतू निर्माण होतात. रोग येतात. तुम्हालाच त्याचा त्रास होतो. असा त्रास सहन करायचा नसेल तर पाणी वाहू द्या. कचरा व्यवस्थापन योग्य पद्धतीने करा. लोकसंख्या आटोक्यात आणा.
मी जे काही सांगितले त्याचा विचार कर. योग्य दिशेने पाऊल ठेव. पर्यावरण संरक्षणाची जबाबदारी घे. पाणी हेच जीवन आहे. असे पाणी प्रदूषित होऊ देऊ नकोस. जेव्हा गरज असेल तेव्हा मी तुझ्याशी पुन्हा बोलेनच!