Science, asked by savitapawar63234, 4 months ago

National science day speech in marathi

Answers

Answered by garimasinghdas
0

Answer:

पदार्थावर प्रकाशकिरण टाकले असता पदार्थाची संरचना व गुणधर्मानुसार त्यांचे विकिरण (Diffractc) होते. सर चंद्रशेखर व्यंकट रामनांनी आपल्या के. एस. कृष्णन, के. आर. रामनाथन व अन्य सहकाऱ्यांबरोबर विविध पदार्थावर प्रकाशाच्या होणाऱ्या विकिरणावर संशोधन केले.

रामन यांनी एकाच रंगाचे प्रकाशकिरण घेऊन ते निरनिराळ्या पदार्थातून नेले. त्या पदार्थातून बाहेर पडणारा प्रकाश तपासून पाहिला असता, त्यांना प्रकाशाच्या तरंगलांबीत बदल झालेला दिसला.

पारदर्शक माध्यमातून प्रकाश जात असताना माध्यमाच्या अणूत किंवा रेणूत प्रकाशाची ऊर्जा काही प्रमाणात शोषली जाते. या शोषलेल्या ऊर्जेची अणूत किंवा रेणूत आंतरक्रिया होते. अणुरेणूंतील ऊर्जास्तरात बदल घडून येतात. हे बदल कायम स्वरूपाचे नसले तर शोषलेली ऊर्जा परत उत्सर्जति केली जाते. विकिरित प्रकाश हाही ऊर्जा उत्सर्जनाचाच एक प्रकार आहे. विकिरित प्रकाशाची तरंगलांबी (वेव्हलेंथ) मूळ प्रकाशापेक्षा कमी किंवा जास्त असू शकते. त्यानुसार विकिरित प्रकाशाच्या वर्णपटात मूळ प्रकाशाच्या रेषांच्या आधी किंवा नंतर अतिक्षीण अशा रेषा आढळतात. या क्षीण रेषांच्या स्थानांवरून आणि त्यांच्या दीप्ती (इंटेसिटी)वरून अणुरेणूंमधील ऊर्जेच्या स्तराविषयी माहिती मिळते. रेणूतील वेगवेगळ्या अणूंमधील बंध कशा प्रकारचे आहेत याचीही माहिती मिळू शकते. त्यामुळे रेणूंच्या संरचनेचे आकलन होऊ शकते. प्रा. रामन यांनी ही बाब प्रत्यक्ष पुराव्यानिशी ती सिद्ध केली.

Explanation:

Answered by shreyasbankar280
1

आज २८ फेब्रुवारी रोजी संपूर्ण देशभरात राष्ट्रीय विज्ञान दिवसम्हणून साजरा केला जातो. देशाचे महान शास्त्रज्ञ सी. व्ही. रामन यांनी आजच्या दिवशी जी किमया केली होती. त्यामुळे त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आज देशभरातील शाळा, महाविद्यालयात विज्ञान दिन साजरा केला जातो.

महान वैज्ञानिक भौतिक शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकट रामन यांनी २८ फेब्रुवारी १९२८ रोजी भौतिकच्या गंभीर विषयावर एक महत्त्वपूर्ण शोध लावला होता. पारदर्शी पदार्थ मधून जाणाऱ्या प्रकाशांचा किरणात बदल करणारा हा बदल रामन यांनी शोधून काढला. त्यामुळे त्यांना १९३० साली भौतिकमध्ये नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मिळवणारे ते केवळ पहिले भारतीय नव्हते तर आशियातील पहिले व्यक्ती होते. हा शोध लावल्यानंतर त्यांच्या सन्मानार्थ १९८६ पासून देशभरात या दिवशी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. १९५४ साली भारत सरकारने त्यांना सर्वोच्च भारत रत्न पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला.

राष्ट्रीय विज्ञान दिवस २०२० ची थीम ही 'Women in Science' आहे. विद्यार्थ्यांनी विज्ञान क्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, त्यांचे विज्ञानाप्रती आकर्षण वाढावे, यासाठी हा दिवस साजरा केला जातो. देशभरात विज्ञान दिन साजरा करण्याचा मूळ हेतू हाच असल्याने आज देशभरात आजच्या दिवशी विज्ञान दिन साजरा केला जातो.

Similar questions