Nature Poem meaning in Marathi
Answers
Nature Poem in Marathi
निर्मात्याच्या अविष्काराने
धुंद होउन जावे
सुंदर फुललेल्या निसर्गाचे
गंध घेऊन गावे
पहाटेच्या वाऱ्याकडुन
थोडीशी चंचलता घ्यावी
कोवळ्या त्या किरणांकडुन
थोडीशी कोमलता घ्यावी
उमलत्या फुलाकडुन
नाजुकशी सुंदरता घ्यावी
थंड मंद हवेला कसं
नाजुक स्पर्शाने जाणावे
निर्मात्याच्या अविष्काराने
धुंद होउन जावे
उगवत्या त्या सूर्याकडुन
थोडीशी स्फूर्ती घ्यावी
निळ्या विशाल आसमंताकडुन
थोडीशी क्षमता घ्यावी
उपेक्षित काळ्या मातीकडुन
मायेची ममता घ्यावी
मावळत्या त्या सुर्याकडुन
जीवनाचे सत्य जाणावे
निर्मात्याच्या अविष्काराने
धुंद होउन जावे
पौर्णिमेच्या चंद्राकडुन
थोडीशी प्रीत घ्यावी
शुक्राच्या चांदणीकडुन
प्रणयाची रीत घ्यावी
मावळत्या चंद्राचे
विरहाचे दूःख प्यावे
थकलेल्या रात्रीचे
निद्रेचे सुख घ्यावे
निर्मात्याच्या अविष्काराने
धुंद होउन जावे
सुंदर फुललेल्या निसर्गाचे
गंध घेऊन गावे
Answer:
नेचर / नैचर
Explanation:
Okkk