नवया युगाची गानी निबंध
Answers
Answer:
hi mi rohan mala follow kara , thanks.
दिनांक २ जानेवारी ते ४ जानेवारी २०१६ या कालावधीत अमृतवाहिनी इंजिनिअरींग कॉलेज, संगमनेर यांनी "अमृतवाहिनी मेधा २०१६' कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात विकासपिडियाचे कॅम्पेन करण्यात आले. याचाच एक भाग म्हणून तेथील सर्व पदवी आणि पदवीत्युतर अभियांत्रिकीच्या विद्यार्थी आणि प्राध्यापकासाठी 'ग्रामीण विकासात आधुनिक तंत्रज्ञानाचा सहभाग' या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली.
खाली स्पर्धेत आलेले प्रथम, द्वितीय आणि तृतीय पारितोषिक विजेत्यांचे निबंध दिले आहे.
प्रथम पारितोषिक विजेता निबंध
लेखक - चंदे कल्याणी उत्तम
काळ्यारात्रीला पार पडून शुभ सकाळ होते. सकाळी शेतकरी रानाकडे जातो. व्यापारी धनाकडे जातो. विद्यार्थी ज्ञानाकडे जातो. थोडक्यात काय तर माणूस आपल्या जगण्याकडे जातो. माणूस जगात असताना सतत नाविन्याचा ध्यास घेत असतो. त्यासाठी विविध तंत्रांचा शोध घेत असतो. अगदी अनादी काळापासून तो नाविन्याचा शोधात आहे. अशा नावीन्यातून नवं तंत्र विकसित होत असतं. अशा तंत्रातून तो आपलं जगणं अधिकाधिक सुकर करत असतो. म्हणजेच तो आपल्या गावाच्या विकासासाठी नवतंत्रज्ञानाच्या उपयोगाविषयी आपण माहिती घेऊयात.
ग्रामगीतेमध्ये तेराव्या अध्यायातील १०३ आणि १०४ व्या ओव्यांत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटले आहे.
“ सुंदर असावे वाचनालय! नाना ग्रंथ ज्ञानमय!
करावया सुबुद्धीचा उदय! गाव लोकी!!
काय चालले जगामाजी! कळावे गावी सहजासहजी!
म्हणोनी वृत्तपत्रे असावी ताजी!
आकाशवाणी त्याठायी!!