Need a marathi essay on jhade bolu lagle tar....urgent
Answers
Hope it is useful for you...
Answer:
एक दिवशी दुपारी मला खूप कंटाळा येऊ लागला.तेव्हा विचार केले जवळच्या बागेत जाऊन यावे.तिथे एका झाडाखाली मी झोपून राहिलेली,तेव्हा मनात विचार आला,जर हे झाड बोलू लागले तर!
तर ते म्हणेल, "मुली कशी आहेस? मी तुझाच मित्र बोलत आहे.तुझ्या पणजोबांनी या ठिकाणी बी रुजवली होती.तेव्हा माझा जन्म झाला. त्यांनी मला खूप संभाळले.आता मी खूप मोठा झालो आहे.
माझ्या अंगावर पक्षी बसतात.तुम्ही मुले माझ्या सावलीत बसतात.तेव्हा मला खूप बरे वाटते.मी तुम्हाला फळे व फुले देतो.माझ्यामुळे तुम्हाला श्वास घेण्यासाठी ऑक्सीजन मिळतो.माझ्यामुळे वातवरण थंड राहते, पाऊस पडतो व हवा शुद्ध राहते.
मी तुमची इतकी मदत करतो,पण तरीही तुम्ही माझ्याशी व माझ्या कुटुंबाशी फार वाईट वागता.आम्हाला तुम्ही तोडता.आम्ही नसलो,तर तुमचे खूप नुकसान होईल.तुम्हाला शुद्ध हवा मिळणार नाही.जमीन कसदार राहणार नाही.पाऊस नाही पडणार.प्रदूषण वाढेल.
तेव्हा आमची काळजी घेत जा".इतक्यातच अजोबांनी मला हाक मारली,मी माझ्या विचारांच्या दुनियेतून बाहेर पडले.
मग मी त्या झाडाला धन्यवाद म्हटले आणि तिथून निघून आली.
Explanation: