India Languages, asked by riyavmishra2842006, 7 months ago

nehru bhartacha shod aatmacharitra nibandh in Marathi ​

Answers

Answered by manasikalamkar12
0

Explanation:

नेहरू, जवाहरलाल मोतीलाल : (१४ नोव्हेंबर १८८९–२७ मे १९६४). भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक थोर नेते, स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान व आंतरराष्ट्रीय दर्जाचे श्रेष्ठ मुत्सद्दी. त्यांचा जन्म अलाहाबाद येथे काश्मीरी ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील ⇨ मोतीलाल नेहरू एक नामांकित व राष्ट्रीय लढ्यातील एक ज्येष्ठ पुढारी होते. आपल्या कर्तुत्वाच्या बळावर त्यांनी पैसा व प्रतिष्ठा मिळविली होती. जवाहरलालांची आई स्वरूपराणी धार्मिक वृत्तीची होती. आईकडून आणि मावशी बिबीअम्माकडून जवाहरलालादी मुलांना रामायण–महाभारतातील कथा आणि सदाचाराची शिकवण यांचा लाभ झाला. मोतीलाल यांना अनिष्ठ रूढी व धार्मिक बाबतीत फारशी आस्था नव्हती. जवाहरलालांचे प्राथमिक शिक्षण घरीच उत्तम शिक्षकांकडून पार पडले. त्यांपैकी फर्डिनांट टी ब्रुक्स या शिक्षकाने जवाहरलालांमध्ये विज्ञानाची व वाचनाची आवड निर्माण केली. शिवाय ब्रुक्स स्वतः थिऑसॉफिस्ट आणिॲनी बेंझट यांचे शिष्य होते. त्यामुळे जवाहरलाल यांच्या कोवळ्या मनावर काही काळ थिऑसॉफीचा प्रभाव होता. त्यांचे मन प्राचीन धर्मग्रंथांकडे आकृष्ट झाले. त्यांनी उपनिषदे, भगवद्‌गीता, महाभारत, रामायण यांचे वाचन केले. पंडितजींचे एकूण बालपण काहीशा संमिश्र सांस्कृतिक वातावरणात पार पडले घरातील पश्चिमी वळणाची राहणी, आई व मावशी यांचे पारंपारिक संस्कार, उत्तर भारतीय उच्च वर्गांत टिकून राहिलेल्या खानदानी, मुस्लिम संस्कृतीचा प्रभाव आणि वडिलांकडून लाभलेला अनिष्ठ सामाजिक रूढींबद्दलचा बंडखोरपणा इ. कारणांनी व आधुनिक पद्धतीच्या शिक्षणाने पंडितजींचे मत कोणत्याही एकान्तिक विचारधारेपासून अलिप्त राहिले व त्यास एक उदार सहिष्णू वळण लागले.

शिक्षण : घरी प्राथमिक तयारी झाल्यानंतर जवाहरलाल पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला गेले(१९०५). इंग्लंडमधील हॅरो या प्रसिद्ध विद्यालयात दोन वर्षे शिक्षण घेऊन पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी ट्रिनिटी महाविद्यालयात (केम्ब्रिज विद्यापीठ) ते दाखल झाले (१९०७). हॅरो येथे असताना त्यांना बक्षिस म्हणून ट्रीव्हेल्यन लिखित गॅरिबॉल्डीच्या चरित्राचा एक भाग मिळाला. या चरित्राचे इतर खंडही त्यांनी मिळविले. काव्हूर, मॅझिनी व गॅरिबॉल्डी यांप्रमाणे आपणही आपल्या देशासाठी काहीतरी करावे, अशी प्रबळ इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली. यावेळी भारतात वंग-भंग चळवळ जोरात होती. परदेशी मालावरील बहिष्कार, स्वदेशीचा पुरस्कार व सशस्त्र क्रांती हा केंब्रिज विद्यापीठातील भारतीय विद्यार्थ्यांचा एक चर्चेचा विषय होता. त्यावेळचे सारे विद्यार्थी लो. टिळक पक्षाचे म्हणजे जहाल राष्ट्रवादी होते. पंडितजीही त्याला अपवाद नव्हते. या सुमारास त्यांनी श्यामजी कृष्णवर्मा, गोपाल कृष्ण गोखले, बिपिनचंद्र पाल इ. राष्ट्रीय नेत्यांची भाषणे ऐकली. १९०५ च्या रूसो-जपानी युद्धाचा त्यांच्या मनावार परिणाम झाला. भूशास्त्र, रसायनशास्त्र आणि वनस्पतिशास्त्र हे तीन विषय घेऊन ते दुसऱ्या वर्गात पदवी परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांनी बॅरिस्टरची परीक्षा दिली व हिंदुस्थानला परतले (१९१२). या सात वर्षांच्या इंग्लंडमधील वास्तव्यात, त्यांनी बर्नार्ड शॉ. लौ डिकिन्सन, आयव्हॅन ब्लॉक, हॅवलॉक एलिस, एबिंग क्रॉफ्ट, ओटो व्हायनिंजर, ऑस्कर वाईल्ड, वाल्टर पेटर इ. प्रसिद्ध लेखकांची पुस्तके वाचली. त्यांच्या मनावर इंग्लंडमधील उदारमतवादाचाही खोल ठसा उमटला. फेबियन समाजवादी चळवळीकडे आणि इतर समाजवादी विचारांकडे ते आकृष्ट झाले.

Similar questions