New years speech in marathi
Answers
Answered by
30
Answer:
मराठी भाषण नवीन वर्ष :
मराठी भाषण नवीन वर्ष :नवीन वर्ष हा एक सणच आहे जो संपुर्ण जगात साजरा केला जातो. भारतात वेगवेगळ्या धर्माचे , प्राताचे लोक आपाआपल्या वेळेनुसार नववर्षाचे सुरूवात करतात. इंग्रजी कालदर्शिके नुसार नववर्ष १ जानेवारीला उत्सवात साजरा केला जातो. ३१ डिसेंबर ला रात्री सगळे लोक एकत्र येऊन हा आनंद साजरा करतात. नववर्षाची सगळे एकमेकांना शुभेच्छा देतात. काही जण भेटपत्र पण देतात. तर काही लोक या दिवशी चांगले संकल्प करतात. हिंदू पंचांगा नुसार नवीन वर्षाची सुरूवात चैत्र शुध्द प्रतिपदा ‘गुढी पाडवा’ याने होते. या दिवशी हिंदू धर्मीयांकडे घराच्या प्रवेशदारी उंचावर गुढी उभारली जाते. ही गुढी विजय आणि समृध्दीचे प्रतीक आहे. तसेच या दिवशी ‘पाडवा पाहाट’ असा गायनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो, नववर्षाच्या स्वागतासाठी मोठमोठाल्या रांगोळ्या काढल्या जातात, हिंदु संस्कृतीची ओळख करुन देणारी मिरवणुक काढली जाते. अशा प्रकारे नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या उत्सवात केले जाते.
mark as brilliant answer plz
Similar questions