India Languages, asked by lalithagavara08, 4 months ago

nibamd on maji mahatvakanksha​

Answers

Answered by madhumalaprasad1
0

Answer:

did you mean ... माझी महवतकंशा..!!


lalithagavara08: yes
madhumalaprasad1: ok then I will try to give answer
Answered by Anonymous
5

महत्वाकांक्षा

महत्वाकांक्षा---जीवनाचे सर्वांगीण प्रगतीसाठी आवश्यक असलेला गुण.---"महत्त्वाकांक्षा"; स्वतःची इछा, शब्दशः अर्थ. ईछा कोणाची? तर स्वतः त्या व्यक्तीची. येथे मूलभूत काय? तर "ईछा".

व्यक्ती जन्माला येते. "जीवाबरोबरच अहंकार"ही येतो. किंबहुना "अहम"हा जीवाचे अस्तित्वाचा पुरावाच[आधार] असतो."मी आहे" ही जाणीव हा जीव जन्मतःच "ट्याहां"च्या सहजोद्गाराने इतरांना [जगालाच] करून देत असतो. "मी आहे;माझी दखल घ्या; माझे अस्तित्व मान्य करा"-हा हुंकार ही या "अहंकाराची" कन्या--ईछा--कामना.

"जीवाला" स्व्तःचे;अस्तित्व ;व नंतर इतरांचे द्रिष्टीने स्वतःचे मोठेपण--महत्त्व,सिद्ध करण्याची मूलभूत प्रेरणा-ईछा-ही त्याच्या ह्या जगातील अस्तित्व-प्रगतीसाठी म्हणजेच स्वतःचे सर्वांगीण संरक्षणासाठी [स्वहितासाठी] जरूरीची असते. हे संरक्षण जोपसणे; वाढवणे म्हणजे इतरांच्या तुलनेत स्व्तःचे महत्त्व वाढवणे आले.{येथे "मी" आणि"इतर" हे व्दंव्द निर्माण होते,जन्मते}. महत्त्व निर्माण करणेसाठी तुलना व त्या मोठेपणाचे प्राप्तीसाठी आला "संकल्प". हा आहे जन्म संकल्पाचा. अहंकार--इछेचापिता; तर संकल्पाचा आजोबा-पितामह.

महत्त्व कश्याला द्यायचे?------ज्ञानाला;;सत्तेला;;अधिकाराला---कां अर्थाला? यांतील एक किंवा अनेकांचा[बदलती प्रमाणे] मिळून ठरतो उद्देश-ध्येय. या ध्येयाचे प्राप्तीसाठी मार्ग कोणता? "सर्वेषां अविरोधेन"? विरोधाचा? फक्त स्वार्थाचा कीं सर्वांना सामावून घेणारा; अनेकांचे कल्याणाचा;समन्वय साधणार्‍या प्रयत्नांचा?. [स्वार्थ की परमार्थ].

"महत्त्वाकांक्षा" ही फक्त स्वतःचीच असते काय? नाही. "स्व"-च्या अर्थावरतिचे स्वरूप ठरते. फक्त "स्व" म्हणजे व्यक्तिगत. "स्व"मध्ये कुटुंब आले कीं कौटुंबिक. संस्था-गाव-राज्य-राष्ट्र या चढत्या श्रेणीने महत्त्वाकांक्षेचे विशेषण व तिची व्यापकता ठरत असते. महत्त्वाकांक्षा ही राक्षसीहि असते. स्वतःबरोबर इतरांचा अगदी राष्ट्रांचाही सर्वनाश करणारी. हिटलरची महत्त्वाकांक्षा राक्षसीच होती.

Attachments:
Similar questions