India Languages, asked by jayeshkunjir0909, 2 months ago

nibandh in Marathi language​

Answers

Answered by Anonymous
0

Answer:

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज आपण आमच्या शाळेचा शिपाई निबंध मराठी बघणार आहोत. शिपाई हा कोणत्याही संस्थेतील महत्त्वाचा कर्मचारी असतो. कार्यालयाच्या किंवा संस्थेच्या अधिकाऱ्यांचे आदेश कनिष्ठ कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचविणे हे त्याचे कार्य असते. इतर शाळांप्रमाणे आमच्या शाळेत रामजी नावाचा शिपाई आहे. तो नेपाळचा राहणारा आहे. त्याची उंची पाच फूट आहे, पण शरीर सुदृढ आहे. तो एक गोरापान व उत्साही मनुष्य आहे. 

तो आठवीपर्यंत शिकलेला आहे. रामजी ३० वर्षांचा आहे. तो विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. पण पत्नी व मुले नेपाळमध्ये त्याच्या आई वडिलांसोबत राहतात. रामजीला शाळेतच एक खोली राहण्यासाठी मिळाली आहे. तो तिथेच राहतो व स्वत:चे जेवण स्वत:च बनवितो.

रामजीला अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. शाळा बंद झाल्यावर चौकीदाराचे काम करावे लागते. सकाळी शाळा सुरू होण्यापूर्वी मुख्याध्यापकाचे कार्यालय झाडून पुसून स्वच्छ करावे लागते. त्यानंतर तो शाळेच्या कार्यालयांची साफ-सफाई करतो. नंतर गणवेश घालून शाळेच्या मुख्य फाटकाशी उभा राहतो. खाकी पँट, शर्ट, काळ्या टोपीत तो गुरखा पलटणीचा जवानच वाटतो. 

मुख्याध्यापक येताच त्यांची बॅग त्यांच्या कार्यालयात नेऊन ठेवतो. भेटावयास येणाऱ्या पालकांना किंवा इतर व्यक्तिंना बाहेर बसवितो. मुख्याध्यापकांची परवानगी मिळाल्यानंतर क्रमाक्रमाने त्यांना आत पाठवितो. मुख्याध्यापकांचे आदेश तो इतर शिक्षकापर्यंत पोहोचवितो. तास पूर्ण झाल्याची घंटी वाजवितो. मुख्याध्यापकांसाठी चहापाण्याची व्यवस्था करण्याचे कामही त्यालाच करावे लागते.

रामजी अत्यंत नम्र व आज्ञाधारक आहे. तो प्रत्येक शिक्षकाशी व इतर कर्मचाऱ्यांशी आदराने बोलतो. तो मुलांचे लाड करतो. एकदा शाळेत माझी प्रकृती बिघडली तेव्हा त्यानेच मला रिक्षा करून घरी नेले. शाळेच्या आवारात क्वार्टरमध्ये राहणाऱ्या शिक्षकांची कामे करून तो ५०-१०० रु. आणखी कमावतो. पगाराचा मोठा हिस्सा तो आपले आई वडील बायको मुलांसाठी घरी पाठवितो. रामजी कर्तव्यतत्पर व प्रामाणिक आहे. जर त्याला कुणा विद्यार्थ्याची किंवा शिक्षकांची एखादी वस्तू सापडली तर ती तो कार्यालयात जमा करतो. 

एकदा एका विद्यार्थ्याच्या आईची पर्स शाळेतच विसरली. घरी गेल्यावर ही गोष्ट तिच्या लक्षात आली ती सरळ रामजीकडे गेली. परंतु त्याने पर्स लगेच मुख्याध्यापकांकडे जमा केली होती. रामजीच्या प्रानाणिकपणावर खुष होऊन ती रामजीला १० रु. बक्षीस देऊ इच्छित होती पण त्याने 'हे तर माझे कर्तव्यच होते' असे म्हणून बक्षीस घेण्यास नकार दिला.

आमचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी सगळ्यांनाच रामजी आवडतो. खरंच तो अतिशय चांगला माणूस आहे.

मित्रांनो तुम्‍हाला हा निबंध कसा वाटला हे  तुम्‍ही कमेंट करून सांगु शकता. धन्‍यवाद

कथनात्मक

Next You are viewing Most Recent Post

 Previousआदर्श विद्यार्थी मराठी निबंध | Adarsh vidyarthi nibandh in marathi

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मराठी निबंध प्रकार

आत्मकथनात्मक

 

कथनात्मक

 

कल्पनात्मक

 

चिंतनात्मक

 

वर्णनात्मक

 

शब्दचित्रामक

 

संबोधनात्मक

संपर्क

तुम्हाला आमचा ब्लॉग कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला जरूर कळवा तुमचे आमच्‍या ब्‍लॉग बद्दल अभिप्राय असल्‍यास किंंवा काही तक्रार असेल तर ती पण आम्हाला नक्की सांगा आपल्या अभिप्रायाचे आम्ही नेहमी स्वागत करू आणि आवश्‍यकते नुसार बदल घडवून आणू . आमच्या ब्लॉगला भेट देणारा प्रत्येक वाचक आमच्या करीता अतीशय महत्वाचा आहे. तसेच तुम्ही सुद्धा आमच्या ब्लॉगवर लेखन करू शकता आणि आपली ज्ञानरूपी माहिती इथं पर्यंत पोचू शकता. त्‍याकरीता पुढील लिंक वापरावी.

संपर्क करण्‍यासाठी येथे क्लीक करा

DMCA Policy साठी येथे क्लीक करा

Answered by Likith1804
0

Answer:

this is the translation of essay in Marathi language निंबंध

Explanation:

Hope it helps please mark me as brainliest

Similar questions