India Languages, asked by Vishakhapagade618, 8 months ago

nibandh lekhan Marathi on MI rashtradhwaj boltoy​

Attachments:

Answers

Answered by geeta5188
2

Answer:

1 -" १८५७ पासून भारतीयांनी आपल्या गुलामीचे जोखड फेकून देण्याचा प्रयत्न चालवला होता. इंग्रजांच्या बलाढ्य शक्तीशी ते प्राणपणाने टक्कर देत होते. भारत पारतंत्र्यात असताना भारतीयांना मी सदैव 7व प्रेरणा देत होतो. प्रत्येक स्वातंत्र्य आंदोलनात अग्रभागी असे. माझ्या रक्षणासाठी माझ्या देखत अनेक बहाद्दरांनी आपल्या रक्ताचा सडा शिंपला. त्यांची स्मृती म्हणून माझ्या अंगावर केशरी पट्टा आला. काळाच्या ओघात माझा चेहरामोहरा वेळोवेळी बदलत गेला. हिरव्या व केसरी रंगामध्ये पट्टी आली. कधी माझ्यावर' वंदे मातरम' ही अक्षरे लिहिली गेली, तर कधी सूर्य, तर कधी चंद्र, कधी कमळ अशी चित्रे काढली गेली. 1920 नंतर मी तिरंगा बनलो व त्या काळी स्वदेशीचे प्रतीक असलेला चरका माझ्या छातीवर अभिमानाने   मिरवू लागलो. स्वातंत्र्योत्तर काळात मला' राष्ट्रध्वज' होण्याचा मान लाभला, तेव्हा चरख्याची जागा सर्व भूम अशोक चक्रा ने घेतली.

" माझा केसरी रंग देशभक्ती आणि त्यागाचे प्रतीक आहे; तर माझा पांढराशुभ्र रंग शांती प्रथा आणि मांगले यांचे सूचक आहे; प्रसाद हिरवा रंग समृद्धीचा दर्शक आहे. माझ्यावरील निर्णय चक्र साऱ्या जगाला सूचित करते की, हेरायचे धर्म, नीती आणि न्याय त्याच्याच आधारे प्रगतीपथावर अखंड गतिमान राहील.

" मित्रा, आजवर अनेकांनी माझ्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावली. स्वातंत्र्यलढ्यात यांनी सर्वांगावर  लाठ्या झेलल्या, तरी त्यांनी कधी माझा अपमान होऊ दिला नाही. हे स्वतंत्र सैनिक देशासाठी हसत-हसत फासावर चढले तेही मला छातीशी कवटाळून !  ते सारे रोमांचकारक सोनेरी क्षण आठवतात आजही माझे मन आनंदाने भरून येते.

" 1947   साली  14 ऑगस्टच्या मध्यरात्री नंतर मी जेव्हा  राष्ट्रस्तंभावर  डोलाने विराजमान झालो, तेव्हा कोट्यवधी भारतीयांच्या डोळ्याचे पारणे फिटले. बाळा, तू एवढ्या अभिमानाने  व  कुतूहलाने माझ्याकडे पाहतोस, म्हणून मी तुझ्याशी मोकळेपणाने बोलतो आहे. नाहीतर आजचा युवक स्वतःच्याच विश्वात एवढा  गुंतलेला असतो की, त्याचे माझ्याकडे कधी लक्ष जात नाही. माझा सन्मान म्हणजे भारतीयांचा- पर्यायाने तुमचाच- सन्मान आहे, हे त्याच्या ध्यानात येत नाही."

पाहता-पाहता आवाज बंद झालं; मी मात्र आमच्या शाळेसमोरच्या चौकात ध्वजस्तंभावर डोलाने फडकत असलेला राष्ट्रध्वज पाहून मनोमनी सुखावलो होतो. नतमस्तक होऊन, राष्ट्रध्वजाला वंदन करून मी माघारी वळलो.

Similar questions