Hindi, asked by mundeshreya7, 5 months ago

nibandh likhna hai

wrong answer will be reported​

Attachments:

Answers

Answered by tanvilove19
1

अंगणात खेळ रंगात आलेला असतो आणि आईची हाक येते, "चला रे घरात, सूर्य मावळला आता..." त्यावेळी त्या सूर्याचा असा राग येतो की, काय घाई झाली होती याला? चांगलं भरपूर खेळायला मिळालं असतं आम्हांला आणि अशाच क्षणी मनात एकदा एक विचार डोकावला, खरंच सूर्य मावळलाच नाही तर?

तर दिवस संपणार नाही. रात्र होणार नाही. दिवसाचे चोवीस तास सर्वत्र उजेडच उजेड राहील. मग भरपूर खेळता येईल.

पण असे किती खेळणार! शेवटी दमायला होईल, विश्रांती हवी असे वाटेल, झोपावेसे वाटेल पण सर्वत्र सूर्यप्रकाशाचा एवढा चकचकाट असेल की

शांतपणे झोपच घेता येणार नाही.

सूर्य सतत आकाशात राहिल्याने उष्णता वाढू लागेल. शेवटी ते तापमान असह्य होईल. फुले कोमेजून जातील. पशुपक्षी हैराण होतील, माणसांच्या अंगाची आग वाढतच राहील. झोप न मिळाल्यामुळे सर्वजण बेचैन होतील.

सूर्य मावळला नाहीतर अंधारात आपले काम साधणाऱ्या चोरांना आळा बसेल पण अंधार झाल्यावर आपल्या घरात वावरणाऱ्या झुरळ, पाली आणि उंदीरमामांचे जीवन अवघड होईल.

सूर्य मावळलाच नाही तर चांदोबा कसा दिसणार? तारे कसे चमकणार? चांदोबाशी गप्पा कशा मारणार? आजीच्या व आईच्या कुशीत झोपून गोष्टी कशा ऐकणार? तेव्हा हे सूर्यदेवा. तू नेहमी प्रमाणेच विश्रांती घे आणि आम्हांलाही विसाव्यासाठी रात्र मिळू दे.

Similar questions