nibandh on aaiche manogat in marathi.
Answers
*आईचे मनोगत essay मराठी*
रोजची कामे करून थकली ग मी! अरे तुम्ही आलात ?
ओळखलत का मला ?
...नाही ?
"स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी"
बरोबर मी रोहनची आई बोलते.
सकाळी लवकर उठून कधी पाणी भरावे लागते, सगळ्यांच्या आधीच मी उठते. रोहनचे बाबा ऑफिसला जाण्यासाठी म्हणून उठतात त्याआधी त्यांना डबा तयार लागतो. सकाळी उठल्या उठल्या पाणी भरल्यानंतर मी रोहन व त्याच्या बाबांचा डबा बनवण्यासाठी तयारी करते.
सकाळचा नाश्ता बनवल्यानंतर रोहनला उठावे लागते. हा मुलगा काही म्हंटले ऐकतच नाही, किमान मला तीन वेळा जाऊन तरी त्याला उठवावे लागते. बरं नाश्त्यात हे का केला ते का केला असे प्रश्न देखील त्यांना पडतात. रोहनचे बाबा ऑफिसला गेल्यानंतर रोहनची स्कूल बस येते, त्यानंतर मला मिळतो तो हा मोकळा वेळ, थोडासा म्हंटला तरी हवाहवासा वाटतो. मग मी माझी कामे लटकते आणि ऑफिसला जायची माझी तयारी चालू होते. आठवड्यातून तीन दिवस मला ऑफिसला जावे लागते व त्या तीन दिवसात माझे खूप घाई गडबड होते.
दुपारचा वेळ माझ्या कामात जातो घरातली सगळी कामे भांडी धुणे लादी पुसणे झाडू मारणे या कामानंतर थोडा वेळ मिळाला तर मी माझे आवडत जोपासते. मला गार्डनिंग करायचा खूप आवड आहे. नवीन नवीन रोपे लावणे यात मला खूप आनंद होतो. भाजी आणायला मलाच संध्याकाळी खाली जावे लागते. संध्याकाळी रोहन व त्याचे बाबा घरी आल्यानंतर संध्याकाळचा नाष्टा त्यांना दिल्यावर मी रोहनचा अभ्यास घ्यायला सुरुवात करते. तसा अभ्यासात हुशार आहे पण थोडं लक्ष मात्र द्यावे लागतेच. त्यानंतर रात्रीच्या जेवणाची वेळ येते, रात्री जेवल्यानंतर भांडी वगैरे घेऊन आम्ही झोपायला लवकरच जातो पण दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचे असते. हे चक्र असेच चालू राहते आणि आता मला याची सवय झाली आहे.
चला मी तुम्हाला कथा काय सांगत बसली, रोहन यायची वेळ झालीच आहे.